समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी
Answers
Answered by
238
नमस्कार मित्रा,
★ समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी -
समाज, समाज म्हणजे काय असतो ? एकमेकांशी सलोखा असणाऱ्या एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. आज भारतातील 45% समाज युवक वर्गात मोडतो. तर त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पण युवकांचीच ना.
थॉमस हक्सले एकदा म्हणाला होता - "मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन."
तरुण हा समाजातील अतिशय सक्षम, चंचल, शक्तिशाली, उत्साही घटक म्हनुन ओळखला जातो. आजचा तरुण उद्याचा वृद्ध असेल. ह्या तरुणाने स्वीकारलेली आव्हाने पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की तारुण्याची तीन 'त'कार असावेत - तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता. या गुणांचे आचरण करणे आवश्यक आहे. या युवकांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे.
स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज, ती धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संभाजीराजे हेदेखील तरुणच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव हे सक्रिय होते तसे आजपण समोर यावेत.
समाजातील आजची आव्हाने जसे की वाढत चाललेली गुन्हेगारी, खराब राजकारण, वाढलेला भ्रष्टाचार, जातीयवाद आणि बेरोजगारी यावर तरुणांनीच काहीतरी उपाय योजले पाहिजेत. आजच्या समाजाची क्रांती फक्त युवकच करू शकतो.
म्हनुन प्रत्येक तरुणाने होईल तेवढा हातभार लावलाच पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात करतोय. तुम्ही पण करा.
धन्यवाद...

1
Answer:
समाज आणि आजचा युवक निबंध
Similar questions