History, asked by sahilchavan30072003, 1 month ago


समाज कला तयार होतो ते सांगा?​

Answers

Answered by guptaashesh4
0

Answer:

Explanation:

समाज : समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो. अर्थात तो अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणाऱ्या संकुचित व मर्यादित अर्थाने वापरला  जातो. उदा., ‘भारतीय समाज’, ‘आर्य समाज’, ‘हिंदू समाज’ इत्यादी. प्रत्येक  ठिकाणी समाज या शब्दापूर्वी उपसर्ग लावलेल्या विशेषनामानुसार या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असतो. तो समान असत नाही. देशवाचक, समूह-वाचक, धर्मवाचक वगैरे भिन्न अर्थाने हा शब्द व्यावहारिक भाषेत वापरला जातो; पण या सर्वांहून निराळा असा समाजशास्त्रीय अर्थ या संकल्पनेमागे आहे. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील ( सातत्यशील ) व सहकारी   सामाजिक समूह असून, त्यातील सभासदांनी एकमेकांतील आंतर-कियेव्दारे आप्तसंबंधविषयक संघटित आकृतिबंध ( संरचना ) विकसित  केला आहे. एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक  संबंध  निर्माण  झालेले  असतात.

Similar questions