History, asked by Sourabhmahajan123, 3 months ago

समाजात कायद्याची गरज का असते

Answers

Answered by 876rupakgmailcom
26

Explanation:

कायदा आणि समाज यांचं अतूट, अजब नातं आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना ज्युरिसप्रुडन्सचा (कायद्याचे तत्त्वज्ञान) अभ्यास करताना कायदा, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांच्याशी निगडित खूप वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो. कायद्याच्या विद्यार्थ्यांना किचकट अॅब्स्ट्रॅक्ट संकल्पना असलेला हा विषय बहुतांशी नावडता असतो; पण ज्युरिसप्रुडन्स कायद्याच्या मुळाशी जाऊन मूलभूत प्रश्नांनाच हात घालतो. कायदा कोणासाठी? कायदा कशासाठी? समाजाला कायद्याची गरज का भासते? कायद्याची उद्दिष्टे काय असावीत? कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या विविध पद्धती कोणत्या? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांची कायद्याची बैठक पक्की होत असते.

तसं बघायला गेलं तर ज्या समाजाला कायद्याची गरजच नाही तो आदर्श समाज म्हणायला हवा. जेथे कोणीच गुन्हा करत नाही, जेथे पोलिसांची गरज नाही अशा समाजाला कायद्याची गरज भासू नये; पण अशा आदर्श समाजातदेखील एखादी कृती 'गुन्हा' आहे की नाही, हे ठरवण्यासाठी तरी कायदा लागेलच ना? कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता, कायदा नेमका काय आहे हे ठरवण्याकरिता, प्रत्येक समाजात शासक व प्रजा अशी विभागणी असायलाच हवी. समाजावर, प्रजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकालाही कायद्याची मदत लागते. एवढेच काय, पण शासकावर नियंत्रण ठेवण्यासाठीही कायद्याचीच गरज लागते. अनियंत्रित हुकूमशाही असेल तर नागरी समाजाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित होईल.

कायद्याच्या कक्षेत नियम, नियमावली तर येतातच; पण सामान्य माणसाच्या सांस्कृतिक आयुष्यातील रूढी, प्रथा, परंपरा आणि पद्धतींचाही त्यात समावेश होतो. सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील पाळली जाणारी शिस्त आणि नियम हेही कायद्याच्या कक्षेत येऊ शकतात. सामाजिक व सांस्कृतिक संदर्भांना कायद्यात मोठे स्थान असते. उदा. हिंदू पद्धतीप्रमाणे केलेल्या विवाहात सप्तपदी व लाजाहोम-कन्यादान हे विधी झाले नाहीत तर तो विवाह वैध धरला जात नाही. विवाहाप्रसंगी विधीनुसार दिली जाणारी 'वरदक्षिणा' आहे की 'हुंडा', हे हुंडा प्रतिबंधक कायदा ठरवतो. समाजात चारचौघांत वावरताना योग्य पेहराव असायला हवा, आपले इतरांशी वागणे सभ्य असायला हवे. असभ्य व इतरांच्या मनात लज्जा उत्पन्न करेल असे कपडे व वर्तन केल्यास 'इनडिसेंट' वागण्याबद्दल अटक होऊ शकते. अशा आणि अशांसारख्या अनेक रोजच्या जीवनातल्या छोट्या गोष्टींचा अंतर्भाव कायद्यात होतो. आजच्या जगात नागरी समाजात राहणा-या व्यक्तीचे वैयक्तिक व सामाजिक आयुष्य वेगवेगळ्या कायद्यांनी पूर्णत: वेढलेले आहे. आर्थिक कायदे, वैयक्तिक कायदे, गुन्हेगारी कायदे, सामाजिक कायदे आणि मूलभूत हक्कांविषयीचे कायदे संपूर्ण समाजाचे वैयक्तिक आयुष्य नियंत्रित करतात. एकीकडे समाज कायदा घडवतो तर दुसरीकडे कायद्यांतून समाज, समाजाची मानसिकता घडते. नागरी समाजात असे कायद्याचे व समाजाचे अद्वैत आहे.

कायदा समजून घेताना, कायद्याचा अभ्यास करताना त्यामागचे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ लक्षात घ्यावे लागतात.

Answered by ssanskriti1107
0

Answer:

  • कायदा महत्त्वाचा आहे कारण तो समाजात काय स्वीकारले जाते याचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून काम करतो.

  • त्याशिवाय सामाजिक गट आणि समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होईल. आपण त्यांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. कायदा समाजात होणारे बदल सहज स्वीकारण्याची परवानगी देतो.

  • समाज हा एक वेब संबंध आहे आणि सामाजिक बदल म्हणजे साहजिकच सामाजिक संबंधांच्या व्यवस्थेतील बदल, जिथे सामाजिक संबंध सामाजिक प्रक्रिया आणि सामाजिक परस्परसंवाद आणि सामाजिक संस्थांच्या संदर्भात समजले जातात.

  • अशाप्रकारे, सामाजिक बदल हा शब्द सामाजिक संस्था, सामाजिक प्रक्रिया आणि सामाजिक संघटनेतील वांछनीय भिन्नता दर्शवण्यासाठी वापरला जातो.

1. समाजावर प्रत्यक्ष परिणाम घडवून सामाजिक बदलाबाबत कायदा महत्त्वाची अप्रत्यक्ष भूमिका बजावतो. उदाहरणार्थ: एक अनिवार्य शैक्षणिक प्रणाली स्थापित करणारा कायदा.

2. दुसरीकडे, कायदा अनेक प्रकरणांमध्ये मूलभूत सामाजिक संस्थांशी अप्रत्यक्षपणे अशा प्रकारे संवाद साधतो की कायदा आणि सामाजिक बदल यांच्यात थेट संबंध असतो. उदाहरणार्थ, बहुपत्नीत्व प्रतिबंधित करण्यासाठी तयार केलेला कायदा.

#SPJ3

Similar questions