History, asked by pratikwaghe856, 3 months ago

समाजहितासाठी चळवळी आवश्यक असतात. चुक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा​

Answers

Answered by PRANAY14396
1

Explanation:

समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक व व्यवस्था यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यांमध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्ती एकत्र येऊन हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. सामाजिक चळवळी समाजव्यवस्थेत अनुकूल स्वरूपातून सामाजिक बदल घडवून आणतात. समाजातील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांना समोर ठेवून चळवळी आकारास येतात. त्यामध्ये मिरवणूका, मोर्चे, घोषणा, आंदोलने इत्यादी कृतींचा उपयोग केला जातो. ते दृष्य स्वरूपात असतात.

सामाजीक चळवळी हे समाजशास्त्रातील महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र मानले गेले असून त्याचा अभ्यास करत असतांना अनेक अभ्यासकांनी विविध संकल्पनात्मक चौकटी विकसित केल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करत असतांना फुक्स आणि लिन्केन बाख यांनी असे प्रतिपादन केले की, सामाजिक चळवळींच्या अध्यापनाचे अभ्यासक्षेत्र प्रामुख्याने दोन घटकात विभागले आहे. एकीकडे सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासाने चळवळीत सहभाग घेतलेल्या सामाजिक कर्त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर भर दिला; तर दुसरीकडे व्यापक सामाजिक–राजकीय व्यवस्था, संघर्ष यांवर भर देत सामाजिक चळवळींकडे ‘राजकीय प्रकल्पाचे वाहक’ म्हणून बघितले आहे. या संदर्भात रुडाल्फ हेर्बेल, नील स्मेल्सर, जॉन विल्सन, ड्रेसलर व विलिस, हर्बर्ट ब्लूमर, टर्नर व किलियन, लुंडबर्ग, जे. आर. गसफील्ड इत्यादी समाजशास्त्रज्ञ-विचारवंतांनी ‘सामाजिक चळवळ’ या शब्दाची व्याख्या केली आहे.

पॉल विल्किंन्सन यांच्या मते, ‘समाजाच्या कोणत्याही थरात मोठ्या प्रमाणावर सामूहिक बदल घडविण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद असे कोणतेही धोरण स्वीकारण्याची तयारी ठेवून केलेले काम म्हणजे सामाजिक चळवळ होय’.

पार्थ मुखर्जी यांच्या मते, ‘सामाजिक चळवळ ही सर्वसमावेशक, पर्यायी आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम असते’.

जे. आर. गसफील्ड यांच्या मते, ‘प्रस्थापित समाजरचनेत बदल घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामुदायिक स्वरूपाच्या मागण्या म्हणजे सामाजिक चळवळ होय’.

जॉन विल्सन यांच्या मते, ‘सामाजिक व्यवस्थेत व्यापक प्रमाणावरील परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडून येणाऱ्या बदलांना प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक, संघटित रित्या, असंस्थीकृत साधनांचा अथवा मार्गांचा अवलंब करून करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय’.

रुडाल्फ हेर्बेल यांनी सामूहिक भावनांच्या प्रगटीकरणावर भर दिला आहे. त्यांच्या मते, ‘संघटना बांधणे हे व्यक्तिगत आकांक्षांना सामूदायिक रीत्या प्रगट करण्याचे साधन आहे’. थोडक्यात, व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षांना एकत्रितपणे व्यक्त करण्याचे कार्य म्हणजे सामाजिक चळवळ होय.

वरील व्याख्यांवरून सामाजिक चळवळीचे स्वरूप किंवा प्रमुख अर्थ पुढील प्रमाणे सांगता येते :

(१) सामाजिक चळवळीत अनेक लोक एकत्र येऊन जाणीवपूर्वक व हेतुत: सामुहिक प्रयत्नांतून सामाजिक परिवर्तनाला प्रभावित करणारी एखादी कृती करतात.

(२) सामाजिक चळवळी जुनाट, अमानवी रूढी, परंपरा इत्यादींना विरोध करण्यासाठी तसेच कालबाह्य सामाजिक संकेत, गुलामी, पारतंत्र्य इत्यादींच्या विरोधात नव-स्वातंत्र्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आखल्या जातात.

(३) सामाजिक चळवळीत अंतर्भूत असणारे सामुहिक प्रयत्न कमी-अधिक संघटित स्वरूपातील असणे अभिप्रेत असते.

(४) सामाजिक चळवळीचे स्वरूप सामुदायिक कृतीचे, लवचिक किंवा ताठर असू शकते.

(५) काही सामाजिक चळवळी समाजाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात, तर काही चळवळी अडथळे निर्माण करतात.

(६) चळवळीद्वारा मानवी संबंधामध्ये व परस्परविषयक दृष्टिकोनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न होतो.

समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांना धरून होत नसेल, तर या मूल्यांपासून वंचित असलेला समूह एका समान पातळीवर नेतृत्व, विचारप्रणाली, कार्यकर्ते इत्यादींचे नियोजन करून एकत्र येतो व आंदोलन, चळवळ, मोर्चे, घेराव अथवा उपोषण इत्यादी मार्गांद्वारे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात, सामाजिक चळवळी वा आंदोलने या समाजातील अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेच्या असमाधानकारक कार्याचा परिणाम आहेत. मुळात ‘सामाजिक चळवळ’ ही संकल्पना ‘विकास’ या संकल्पनेप्रमाणे सापेक्ष आहे. त्यामुळे या संकल्पनेची अशी एकमेव व्याख्या करता येणार नाही. ती व्यक्तीपरत्वे व संघटनेपरत्वे बदलू शकते, सामाजिक परिवर्तानाला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे हे प्रमुख उद्दिष्टे सामाजिक चळवळींचे असते.

सामाजिक चळवळींचे अभ्यासक्षेत्र : सामाजिक चळवळी या सामूहिक क्रिया असल्याने सामाजिक चळवळीसाठी गतिशीलता, विचारप्रणाली आणि दिशाभिमुख परिवर्तन हे तीन घटक फार महत्त्वाचे असतात. जगभर सुविधा प्राप्त नसलेला समूह मग तो जातीय, वांशिक अल्पसंख्यांक असो किंवा निम्न जाती वर्गातील असो, तो समूह असमानता, भेदकरण आणि वंचितता यांविरुद्ध संघटित होतो व आपले आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकारांसाठी लढत असतो. सामाजिक चळवळी या विशेषत: पर्याय, विचारधारा, कार्यकर्ते, नेतृत्व आणि संघटना या पाच घटकांवर आधारित असतात. हे सर्व घटक एकमेकांवरच अवलंबून आणि एकमेकांना पूरक असतात. स्थानिक प्रश्नांसारख्या संकुचित उद्दिष्टांपासून ते समाजपरिवर्तनाच्या विशाल उद्दिष्टांपर्यंत चळवळींचे उद्दिष्टे बदलत असतात. याशिवाय समाजातील असंतोषाची भावना, चळवळीला प्रेरणा देणारी परिस्थिती आणि गती देणारे नेतृत्व यांचाही चळवळींवर परिणाम होतो.

Similar questions