समानार्थी शब्द सांगा। 1 लपण्याची जागा
2 संकट
3कृतज्ञाता 5
4 संरचना
Answers
Answer:
Answer:
१. लपण्याची जागा = आडोसा.
२. संकट = आपत्ती.
३. कृतज्ञता = केलेल्या उपकाराची जाणीव.
४. संरचना = आराखडा.
Explanation:
समानार्थी शब्द:
समानार्थी शब्द म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द. खरे पाहता, मराठी ही एक संपन्न भाषा आहे. इथे प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण तरीही प्रत्येक शब्दासाठी एक तरी समानार्थी शब्द आहेच.
समानार्थी शब्दांचे महत्त्व:
समानार्थी शब्द हे भाषणात, कवितेत खूप महत्त्वपूर्ण असतात. बऱ्याच वेळा, कवितेत यमक साधण्यासाठी समानार्थी शब्द वापरले जातात. तसेच भाषणात किंवा व्याख्यानात जर सामान्य शब्दासाठी एखादा आलंकारिक किंवा त्याच्या सारखाच वेगळा शब्द वापरला तर श्रोत्यांवर आपला प्रभाव पडतो.
काही समानार्थी शब्द:
१. माणूस = मनुष्य.
२. घर = सदन.
३. आई = जननी.
४. आकाश = गगन.
५. देव = परमेश्वर.
६. शिक्षक = अध्यापक.
७. रस्ता = मार्ग.
८. हुशार = विद्वान.
९. श्रीमंत = धनवान.
१०. पाणी = जल.
काही अपवाद:
मराठी भाषेवर अनेक भाषांचा प्रभाव होता. त्यामुळे त्या त्या भाषेतील शब्द हे मराठी भाषेत आले. काही शब्दांमध्ये बदल झाले, तर काही तसेच वापरण्यात येऊ लागले. बऱ्याच अशा शब्दांसाठी मराठी भाषेत स्वतंत्र शब्द नाहीत. अशा शब्दांचे समानार्थी शब्द सुद्धा नाहीत. जसे,
१. केक ( इंग्रजी शब्द )
२. बटाटा ( पोर्तुगीज शब्द )
३. आडकित्ता ( कानडी शब्द )
४. हवा ( परभाषीय शब्द )
५. पेन्सिल ( इंग्रजी शब्द )
६. खडू ( फारसी शब्द )
७. नीट ( इंग्रजी शब्द )
८. लूट ( इंग्रजी शब्द )
९. खूप ( फारसी शब्द )
१०. दौलत ( फारसी शब्द )