समुद्राचे आत्मवृत्त, मनोगत, समुद्र बोलू लागला तर? मराठी निबंध...
Answers
Answered by
18
Answer: मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? ओळखलंत का मला? मी तुमचा आवडता समुद्र बोलतोय. माझ्याकडे पाण्याचा खूप मोठा साठा आहे परंतु ते पाणी खारट असल्याने लोक पिऊ शकत नाहीत.
माझ्यामुळे या पृथ्वीवर जीवन आहे. जलचक्रात माझी भूमिका फार महत्त्वाची आहे. माझ्या माध्यमातून विविध कारणांसाठी वाहतूक केली जाते. माझ्यामध्ये जैवविविधता आहे. माझ्या उदरातून तुम्हांंला खनिजे आणि इतर मौल्यवान वस्तू मिळतात.
मी तुमच्या कितीतरी उपयोगी पडतो. एकीकडे मला तुम्ही देव म्हणून मान देता आणि दुसरीकडे मला कचरा, घाण टाकून प्रदूषित करता. यामुळे मला फार वाईट वाटते. मी निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. माझ्या प्रदूषणामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही माझे संवर्धन कराल अशी अपेक्षा मी करतो.
Explanation:
Similar questions