समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
Answers
Answer:
समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागरे असे म्हणतात.
Explanation:
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जेव्हा समुद्रातील पाणी किनार्याकडे खेचले जाते म्हणजे समुद्रात भरती येते त्यावेळेला किनाऱ्यावर आलेल्या पाण्याला अडवले जाते. किनाऱ्यावर आलेल्या पाण्याला अडवण्यासाठी जमिनीत वाफे तयार केले जातात. भरतीमुळे समुद्रातील पाणी या वाफ्यांमध्ये अडवले जाते व सूर्यप्रकाशामुळे हळूहळू पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन खाली फक्त मीठ राहते. भारतातील समुद्र किनारच्या प्रदेशात भरपूर राज्यांमध्ये अशा मीठागारांची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील पालघर, डहाणू, वसई या शहरालगत अनेक असे मीठागारांची निर्मिती करण्यात आली आहे. ओरिसा राज्यातील मिठागरें मधील मीठ सर्वोत्तम मीठ समजले जाते. किनारपट्टीलगत चे अनेक लोकांचा मिठी निर्मिती हा पारंपारिक व्यवसाय आहे. मिठागरे तयार करण्याच्या पद्धतीला मिठाची शेती असे म्हणतात.