"समई हे सतत्याचे , संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे " या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा
Answers
Answer:
स्वमत:
प्रश्न (अ)
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे.
प्रश्न (आ)
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
समई देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा, म्हणून अन्य दिवे वापरतात; समई नव्हे. देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्येच सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्षा बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवीत नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे, ही तिची वृत्तीच जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च, उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे
एक होती समई Summary in Marathi
प्रस्तावना:
उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार. त्यांना साहित्यनिर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळाले आहे. दीनवाणे, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे.
अनुताई वाघ (17 मार्च 1910-17 सप्टेंबर 1992) यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठात करून देण्यात आला आहे.