Samaj ghadavinyat yuvkanchi jababdaree nibandh
Answers
Answer:
समाज, समाज म्हणजे काय असतो ? एकमेकांशी सलोखा असणाऱ्या एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. आज भारतातील 45% समाज युवक वर्गात मोडतो. तर त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पण युवकांचीच ना.
तरुण हा समाजातील अतिशय सक्षम, चंचल, शक्तिशाली, उत्साही घटक म्हनुन ओळखला जातो. आजचा तरुण उद्याचा वृद्ध असेल. ह्या तरुणाने स्वीकारलेली आव्हाने पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की तारुण्याची तीन 'त'कार असावेत - तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता. या गुणांचे आचरण करणे आवश्यक आहे. या युवकांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे.
स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज, ती धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संभाजीराजे हेदेखील तरुणच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव हे सक्रिय होते तसे आजपण समोर यावेत.
समाजातील आजची आव्हाने जसे की वाढत चाललेली गुन्हेगारी, खराब राजकारण, वाढलेला भ्रष्टाचार, जातीयवाद आणि बेरोजगारी यावर तरुणांनीच काहीतरी उपाय योजले पाहिजेत. आजच्या समाजाची क्रांती फक्त युवकच करू शकतो.
म्हनुन प्रत्येक तरुणाने होईल तेवढा हातभार लावलाच पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात करतोय. तुम्ही पण करा.
Explanation:
above is your answer.
hope it will help you
please mark me as brain list.