Sample congratulations speech for passing an exam in Marathi
Answers
*Congratulations speech for passing an exam*
*परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे आभार व्यक्त करणारे भाषण*
(राजू दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याच्या परिवाराने एक स्नेह संमेलन आयोजित केले आहे, तेव्हा त्याच्या लहान भावाने केलेलं हे भाषण)
नमस्कार,
माझे नाव सोहम. आज आपण ह्या ठिकाणी सगळे जमलेले आहोत, कारण पण तसच आहे. माझ्या भावाने दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली, ह्या साठी सर्वात प्रथम त्याचे अभिनंदन.
राजू दादा हा लहानपणी पासून अभ्यासात हुशार होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जेव्हा खेळायला जायचं तेव्हा राजू अभ्यास करत असायचा. ह्या गोष्टीचा मला खूप राग यायचा पण राजुला अभ्यास करायचा कधीच कंटाळा आला नाही. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसं मला अभ्यासाची गोडी निर्माण झाली, आणि वस्तुस्थिती समजू लागल्यामुळे मी अभ्यासाकडे लक्ष देऊ लागलो. राजू दादा माझ्या पेक्षा मोठा असला तरी तो जेव्हा आठवीत होता तेव्हा तो मला सहावीचे धडे देखील नीट पणे शिकवायचा.
थँक्यू राजू दादा. दादाच्या पुडच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभे्छा.