History, asked by kishorelalit7960, 11 days ago

Samudrabud Ani jaminichi koli kiti ahe

Answers

Answered by ansarimuskan17204
3

Answer:

Explanation:

शोध पोर्टल

शेती

इतर माहिती

जमिनीची सुपीकता आणि आरोग्य व्यवस्थापन

अवस्था:

उघडा

जमिनीची सुपीकता आणि आरोग्य व्यवस्थापन

जमिनीची सुपीकता

तक्ता क्र. २ : महाराष्ट्र राज्यातील विभागवार अन्नद्रव्ये कमतरतेची आकडेवारी (टक्के)

सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे

जमिनीचे आरोग्य

तक्ता क्र. ३ : जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरूनपिकांच्या शिफारस खतमात्रेत खालीलप्रमाणे बदल करावा

६८ व्या युनाईटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये 20१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदावर्ष घोषित करण्यात आले. जमिनीच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण जमिनींची उत्पादनक्षमता वाढविणे, पर्यायाने अन्नधान्य सुरक्षा आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक शेतक-याला त्याच्याकडील जमिनीचे मृद परीक्षण करून जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी प्रत्येक राज्यात निधी उपलब्ध करून दिला जात असून त्याद्वारे योजना राबविण्यात येत आहे. जमिनीच्या आरोग्यानुसार सुधारणा करून पीक पद्धतींचा अवलंब केल्याने शाश्वत अन्नधान्याचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

जमिनीची सुपीकता

जमिनीमधील उपलब्ध असलेल्या गरजेच्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकांना पुरविण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परिक्षणाव्दारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. महाराष्ट्रातील जिल्ह्यानिहाय सुपीकता निर्देशांक व सुपीकतास्तर तक्ता क्र. १ मध्ये दर्शविला आहे. एकंदरीतच राज्याचा सुपीकतास्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदामध्ये कमी

ते अत्यंत कमी आणि पालाशमध्ये भरपूर ते अत्यंत भरपूर आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात सन १९८० ते २00५ या कालावधीत झालेला बदल पाहिला तर नत्र आणि स्फुरदाच्या बाबतीत तो कमी झालेला आहे. परंतु पालाशच्या बाबतीत सुपीकता निर्देशांकात किंचीत घट झालेली दिसून येते.

अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक

सन १९८० सन २००५

नत्र १.५२ १.३५

स्फुरद १.१४ १.०३

पालाश २.५४ २.५२

उपलब्ध निर्देशांक जरी जास्त असले तरी पिकांना शिफारशींत खताच्या मात्रेच्या ५५ टक्के मात्रा कमी करून देणे आवश्यक असते. कारण संपूर्ण उपलब्ध पालाश पिकांना उपलब्ध होण्यासाठी जमिनींचा ओलावा, सेंद्रिय कर्ब, तापमान, सूक्ष्मजिवाणूची संख्या इ. गोष्टींची अनुकूलता असावी लागते.

जिल्हा सुपीकता निर्देशांक सुपीकता स्तर

नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश

पुणे ०.९४ ०.९४ २.७८ कमी कमी अत्यंत भरपूर

अहमदनगर १.२१ ०.८६ २.७७ कमी कमी अत्यंत भरपूर

सोलापूर ०.७४ ०.६५ २.९४ अत्यंत कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर

कोल्हापूर २.१४ 1.5० २.१६ साधारण भरपूर साधारण कमी साधारण भरपूर

सातारा १.४७ ०.८९ १.७५ मध्यम कमी मध्यम

सांगली १.२२ १.१७ २.२७ कमी कमी भरपूर

ठाणे २.०९ १.८१ २.०१ साधारण भरपूर साधारण भरपूर साधारण भरपूर

रायगड १.३६ १.४६ १.५२ मध्यम मध्यम मध्यम

रत्नागिरी ०.८० १.३५ २.६४ कमी मध्यम भरपूर

सिंधुदुर्ग २.०५ १.३५ ०.९६ साधारण भरपूर कमी कमी

औरंगाबाद १.०७ 1.०० २.८८ कमी कमी अत्यंत भरपूर

जालना १.०६ १.०२ 3.०० कमी कमी अत्यंत भरपूर

बीड १.४३ १.७७ २.८६ मध्यम साधारण भरपूर अत्यंत भरपूर

लातूर १.२८ ०.७२ २.७१ मध्यम अत्यंत कमी भरपूर

परभणी १.६६ १.३३ २.६८ मध्यम मध्यम भरपूर

नांदेड १.४३ ०.९२ २.८४ मध्यम कमी अत्यंत भरपूर

उस्मानाबाद १.४१ १.२६ २.५२ मध्यम मध्यम भरपूर

नाशिक १.५३ ०.८१ २.०८ मध्यम कमी साधारण भरपूर

धुळे १.९२ १.०४ २.२८ साधारण भरपूर कमी भरपूर

जळगाव १.०४ ०.९६ २.९८ कमी कमी अत्यंत भरपूर

अमरावती ०.६४ ०.७२ २.८४ अत्यंत कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर

अकोला १.४३ ०.८९ २.७६ मध्यम कमी अत्यंत भरपूर

बुलढाणा ०.७२ ०.९१ २.८४ अत्यंत कमी कमी अत्यंत भरपूर

यवतमाळ १.०२ ०.९८ २.७६ कमी कमी अत्यंत भरपूर

नागपूर १.६५ १.२३ २.८४ मध्यम कमी अत्यंत भरपूर

भंडारा 1.2० 0.9० २.७९ कमी कमी अत्यंत भरपूर

वर्धा 1.6० ०.६६ २.४८ मध्यम अत्यंत कमी भरपूर

चंद्रपूर १.४८ ०.८२ २.४४ मध्यम कमी भरपूर

गडचिरोली १.०७ ०.६१ २.८६ कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर

एकूण राज्य १.३५ १.०३ २.५२ मध्यम कमी भरपूर

तक्ता क्र. २ : महाराष्ट्र राज्यातील विभागवार अन्नद्रव्ये कमतरतेची आकडेवारी (टक्के)

अ. क्र. विभाग जस्त लोह तांबे मंगल

१ पुणे ४९.८२ २०.३६ ०.६६ २.११

कोल्हापूर २५.५६ ७.२३ ०.३१ ०.७०

३ कोकण ३५.२१ २.३१ ०.२७ ०.४३

४ औरंगाबाद ६०.५९ ६.३७ ०.६२ ०.९८

५ लातूर ५१.०४ ११.४१ ०.२७ ४.४९

नाशिक ४०.२७ ४.४४ ०.१८ १.५०

७ अमरावती ३३.९६ ९.८२ ०.०७ ०.५८

८ नागपूर ३३.०८ ४.३० ०.० २.२१

एकुण राज्य ४२.०५ ९.०४ ०.२८ २.२९

महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता ४२.o५ टक्के दिसून येते. त्याखालोखाल लोह (९.०४ टक्के) या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच बोरॉनची सुध्दा जास्त विम्लधर्मीय चुनखडीयुक्त तसेच कोकणातील तांबड्या जमिनीत फार मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते.

सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.

जमिनीतील सामु मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे.

सखोल पिक पद्धतींचा वापर

असमतोल अन्नद्रव्यांचा वापर

अमर्याद सिंचनाचा वापर .

रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.

जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या.

जमिनीच्या वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे एक इंच सुपिक थर पाण्याबरोबर अन्नद्रव्यांसह वाहून जातो.

जमिनीचे आरोग्य

जमिनीचे आरोग्य म्हणजे दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असणे, की याद्वारे पर्यावरणातील हवा व पाणी यांचे संवर्धन होईल, याशिवाय अन्त्रधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणिमात्रांचे आरोग्य सुधारले जाईल. जमिनीचे आरोग्य हे जमिनीच्या रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता , सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात.

Similar questions