सन्मानाचे प्रतीक शाल याविषयी तुमचे विचार लिहा
Answers
Explanation:
मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण क्षेत्रातलं असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रातलं असो वा इतर कोणत्याही क्षेत्रातलं असो, की ज्यामुळे सर्व समाजाचं काहीतरी भलं झालंय. त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेल्या योगदानाची पावती, समाज अशा सत्कारातून त्यांना देत असतो. तसंच शाळा-काॅलेजात उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जातो, किंवा एव्हरेस्टसारखं शिखर चढून जाणाऱ्यांचाही सत्कार केला जातो. इथं तसंच कुल्याही सत्कारामागचा उद्देश कर्तुत्वाची पोचपावती देणं हा असतो, मोठेपणा वयाचा नसून कर्तुत्वाचा असतो.
आपण वर पाहिलं, की कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जातो. हा सत्कार एखाद्या संस्थेकडून वा संघटनेकडून किंवा मग एखाद्या सभेत केला जातो. संस्था, संघटना अथवा सभा ही विराट समाजाचीच लघुरूपं असतात आणि म्हणून त्यांनी केलेला सत्कार समाजानेच केला असं मानलं जातं. शाळा-काॅलेजातले सत्कार वगळले, तर इतर सत्कार मात्र उभी हयात एखाद्या क्षेत्रात समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचे केले जातात;आणि ते ही बहुतकरून आयुष्याच्या उत्तरार्धात.
सत्कार कुणाचाही असो, त्यात शाल आणि श्रीफळ या वस्तू अपरिहार्यपणे असतात. बाकी सन्मान चिन्ह, बुके, मानपत्र वैगेरे त्या त्या कार्यक्रमाच्या स्वरुपावर अथवा मग त्या कार्यक्रमाच्या बजेटवर ठरवलं जात, पण शाल-श्रीफळ मात्र हवंच. मला कुतुहल आहे, ते या शाल-श्रीफळ देण्यामागच्या कारणांचं. काय कारण असावं बरं या प्रथेमागे? मी सत्कार समारंभात शाल-श्रीफळ देण्याच्या प्रथेमागचं काय कारण असावं, हे कुठं नोंदलंय का, हे शोधून पाहिलं पण मला समाधानकारक स्पष्टीकरण नाहीच मिळालं कुठं. मग मीच विचार करू लागलो आणि त्यातून जो अर्थ काढला, तो तुमच्याशी शेअर करतोय..
आपल्याकडे शालीला महावस्त्र असंही म्हटलं जातं तर श्रीफळ हे पूर्णान्न समजलं जातं. मला वाटतं, सत्कारात मोठ्या सन्मानाने त्या व्यक्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या या वस्तू म्हणजे, त्या व्यक्तीने आपल्या उमेदीची वर्ष एखाद्या क्षेत्रात कार्य करण्यात घालवलेली असल्याने, त्या व्यक्तीच्या ‘अन्न-वस्त्रा’ती जबाबदारी यापुढच्या काळात समाज घेईल, याचं प्रतिक असावं हाच अर्थ मला सापडतो. ‘शाल’ वस्त्राचं प्रतिक तर ‘श्रीफळ’ अन्नाचं. आणि कदाचित तसंच असावं. एखादी व्यक्ती आपली उमेदीची वर्ष समाजासाठी खर्च करते आणि