sanitizers advertising in marathi
Answers
Answer:
● स्वच्छताविषयक जाहिरात ।
Answer:
करोना व्हारसने सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वचजण हात सॅनिटाईज करणे, हात धुणे, मास्क लावणे अशा काही प्राथमिक स्तरावरील काळजी घेताना दिसत आहेत. पण हातांना सॅनिटायझर लावल्यानंतर तुम्ही खाली नमुद केलेली काळजी घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. ती चूक तुम्हाला आताच्या आता सुधारणं आवश्यक आहे. जाणून घ्या काय आहे ती चूक!
Explanation:
कोरोना विषाणू पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही उपाययोजना निर्धारित करून दिलेल्या आहेत. त्यातील प्रमुख उपाययोजना म्हणजेच सतत हँड सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करणे! आम्हाला खात्री आहे की तुम्ही सुद्धा आवर्जून हा नियम पाळून स्वत:ची स्वच्छता राखत असाल आणि सुरक्षित राहत असाल. पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर हँड सॅनिटायझर वापरत नाही आहात ना? काही लोक असे आहेत जे हँड सॅनिटायझरचा चुकीचा पद्धतीने वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी दिली आहे एनएमसी हॉस्पिटलच्या माइक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर पारुल सिंघल यांनी! चला जाणून घेऊया चुकीच्या पद्धतीने हँड सॅनिटायझर वापरल्याने काय नुकसान होते.हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातो. एवढचं नाही तर विषाणूंचा चांगल्या पद्धतीने नाश व्हावा म्हणून यात अल्कोहोलचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केलेल असतो. म्हणून हँड सॅनिटायझरसे हात स्वच्छ केल्यावर जर तुम्ही कोणताही पदार्थ जर खाल्ला तर त्या माध्यामातून केमिकल आणि अल्कोहोल तुमच्या पोटात जाऊ शकते. यामुळे फूड पोयझनिंगचा धोका सुद्धा उद्भवतो. या व्यतिरिक्त पोटांचे विविध आजार देखील होऊ शकतात. म्हणून हँड सॅनिटायझर वापरल्यावर लगेच कधीच कोणतीची गोष्ट खाऊ नये.अनेक ख्यातनाम आरोग्य संघटनांकडून हा सल्ला दिला गेला आहे की हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यावर ते चेहऱ्याला अजिबात लावू नये. जर तुम्ही हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यावर ते हात चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावर खाज येऊ शकते आणि जळजळ सुद्धा होऊ शकते. काही लोकांची त्वचा संवेदनशील असते, अशा लोकांनी तर आवर्जून हि गोष्ट लक्षात ठेवावी आणि हँड सॅनिटायझरने धुतलेले हात अजिबात त्वचेजवळ नेऊ नये. इतर सामान्य व्यक्तींपेक्षा त्यांच्या त्वचेवर जलद परिणाम होऊन अॅलर्जी होऊ शकते, सूज येऊ शकते. हि गोष्ट तुमच्या मित्रमंडळींना देखील नक्की सांगा.