India Languages, asked by suyashs2024, 8 months ago

santkrupa zali write its rasagruhan writen by sant bahina bai​

Answers

Answered by reshmaahmed0181
1
Sorry didn’t get you find
Answered by janhavi4000
3

Answer:

वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी व कोणी केली यासंदर्भात हा अभंग लिहिलेला आहे . वारकरी संप्रदायातील संत कवयित्री बहिणाबाई या संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या होत . भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या अभंगातून आढळतो . अभंग या छंदात प्रस्तुत कविता आहे .

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगात केले आहे . संतांचा वाटा किती मोलाचा आहे हे दिसून येते आणि या इमारतीची जपवणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेची आहे .संतांची कृपा झाली व त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली , फलद्रूप झाली असा आशय या ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. संतांबद्दलचा बहिणाबाईंच्या मनातील परम आदरभाव येथे दृष्टीस पडतो .

या अभंगाची भाष साधी व सोपी आहे . इमारतीचे यथोचित रुपक योजिले आहे . संत ज्ञानेश्वर हे पाया , संत नामदेव हे भितींचे दगड , संत एकनाथ हे खांब आणि संत तुकाराम महाराज हे मंदिराचा कळस अशी वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केली आहे . सर्व सामान्य माणसाला उमजेल असा अभंग हा लोकछंद सहजपणे वापरला आहे . संतकृपेची महती लोकमानसात सोप्या भाषेत बिंबवली आहे .

Similar questions