Hindi, asked by dawsonhealthcare20, 7 months ago


सर्कशीचा तंबू माणसांनी खचाखच भरला होता. रिना आई-बाबांबरोबर सर्कस पाहण्यात रंगून गेली
होती. विदुषकाचे खेळ पाहून माणसे पोट धरून हसत होती.
तेवढ्यात वाघाची डरकाळी ऐकू आली. रिंगमास्टर वाघाला घेऊन तंबूत
आला होता. वाघाचे खेळ सुरू झाले. सर्वजण श्वास रोखून वाघाचे खेळ पाहण्यात
गुंग होते.
तेवढ्यात-पिंजऱ्यातून बाहेर येऊन वाघाने अचानक तंबूत उडी मारली. एकच हाहाकार उडाला
आणि...
Who gives me correct ans the first I will mark them as the brainliest
fast........​

Answers

Answered by taetae64
69

आणि....तो वाघ आत तंबूत शिरून सर्वांकडे पाहत होता . प्रेक्षक व वाघाच्यामध्ये मोठे अंतर होते तरी पण भीतीमुळे सर्वांचा थरकाप उडाला सर्व लोक उठून सैरावैरा पळून बाहेर जायची वाट शोधू लागले वाघ उडी मारून रॅम्प वरून चालून प्रेक्षकांच्या दिशेने उडी मारायला पाहत होता , पण तो त्यात असमर्थ ठरत होता . सर्व लोक बाहेर जात असताना धक्काबुक्की चालू झाली. रीनाचा हात तिच्या आईच्या हातातून सुटला व ती दुसऱ्या बाजूला पोहोचली , ती आई व बाबांना शोधत असताना तिच्या बाजूला असणाऱ्या बाईला एक माणसाचा धक्का लागून ती बाई वाघ असणाऱ्या रिंगणात पडली . ती बाई उंचावरून पडली म्हणून तिचा पाय बहुदा फ्रॅक्चर झाला होता तिला उठता येत नाहोते , वाघ तिच्यापासून 7-8 मीटरवर उभा होता;वाघच लक्ष त्या बाईवर नसल्यामुळे ती बाई कोपऱ्यात निपचित पडली होती . वाघ लांब राहून गुरगुरत होता व त्याचा राग दर्शवत होता . परिस्थिती लक्षात घेऊन 14 वर्षांची रीना धाडस दाखवत रिंगणात उडी घेऊन बाईच्या समोर उभी राहिली . त्या बाईला उभं राहायला मदत करून वरच्या लोकांच्या साहाय्याने त्या बाईला वर नेलं पण वाघच लक्ष्य रीना वर पडलं . तो तिच्या दिशेने चालत , गुरगुरत येऊ लागला. रीनाला वर उचलायला वर उपस्थित असलेल्या माणस व तिचे पालक तिला वर उचलून घ्येण्यात असमर्थ ठरले . रीना मनातून घ घाबरली होती पण तिला माहीत होतं की ही वेळ घाबरण्याची नाही . तिला वाचवण्यासाठी रिंग मास्टर व सर्कशीतले लोक प्रयत्न करत होते पण तो वाघ त्यांच्या अंगावर धावून जात होता . रीनाला एक युक्ती सुचली ती धावत जाऊन स्टेज वर चढली व तिने चाबूक हातात घेतले , तिला माहीत होते की वाघाला ताब्यात घेण्यासाठी रिंग मास्टर कायम चाबूक वापरतात . ती सुरक्षित अंतर ठेवून ते चाबूक जोरात जिमनीवर आपटू लागली . वाघ चाबाकाच्या भीतीने पळू लागला . वाघाला चाबूकाची भीती दाखवत रीना रिंग मास्टरांकडे पोहचली . त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटली व त्यांनी लगेच धावत जाऊन साखळी आणून त्या वाघाला शिताफीने पकडले व जेरबंद केले . वाघ पिंजऱ्यात मोठयाने गर्जना करत राहिला . घडलेला प्रकार लोक पाहत होती कोणी तिची प्रशंसा करत होते , तर पत्रकार सर्व काही कॅमेराबद्ध करत होते . रीनाच्या आई वडीलांची भीती गळून पडून त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता . 26 जानेवारीला तिला पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य पुरस्कार भेटला . व ह्या प्रसंगामुळे हिंसक प्राण्यांना सर्कसमध्ये न घ्यायचा नियम जाहीर केला .

always for your help

Answered by Dik24
8

Hope it helps꒰⑅ᵕ༚ᵕ꒱˖♡

- Dik24

Attachments:
Similar questions