India Languages, asked by dimpalchaudhari72, 20 hours ago

सरांश लाखो

भाषा ही मानवाची विशेष निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचे प्रभावी माध्यम आहे. तसेच ते एक ज्ञान संपादनाचे व अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. एका शतकाकडून दुसऱ्या शतकाकडे वाटचाल करताना भाषा ही नेहमी भूतकाळाला सोबत घेऊन वर्तमानाला आपल्यात सामावून घेत, भविष्याकडे वाटचाल करीत असते. भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचे जैविक नाते असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमण भाषेद्वारा होत असते. नवे संबोध, नव्या संज्ञा, नव्या कल्पना, नवे विचार यांच्याद्वारे सांस्कृतिक वारशात पडणारी भर भाषेला समृध्द करत असते हे सारे मुख्यतः साहित्याच्या माध्यमातून होत असते. म्हणूनच प्राथमिक स्तरापासून मुलांच्या वयाशी सुसंगत अशा साहित्याचा समावेश अभ्यासक्रमात केला जातो. त्या साहित्यामुळे विद्यार्थ्याचे भावनिक जीवन संतुलित बनते, वैचारिक समृद्धता येते आणि भाषिक कौशल्य सहज साध्य होतात. एवढेच नव्हे तर साहित्यातून मूल्य संस्कार होतात. वाङमयीन अभिरुची वाढते, व्यक्तीमत्त्व संपन्न होते. निसर्ग, राष्ट्र यांच्याबद्दल प्रेम व कर्तव्य वाटून नैतिक संस्कार होतात व त्यातून खऱ्या जीवनाचा आस्वाद घेता येतो. ​

Answers

Answered by aaooyaar
0

Answer:

I don't know hindi srrry dear friend

Similar questions