सरांशलेखन
पुढील उताऱ्याचा सुमारे एक तृतीयांश सारांश लिहा.
विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील. तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी आहे. परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही. परंतु शिकल्यासवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्याच्याकडे फसविण्यासाठी लागणारा युक्तीवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्यासवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरूरी आहे.शीलाशिवाय जर शिकलेसरवलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणात समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे.
Answers
Answered by
0
Hhhhhhhhhhhhhhhhhiiiiiiiiiiiiiiiiiiii
Answered by
5
Answer:
सरांशलेखन
विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे.विद्या हे एक शस्त्र आहे ,. . एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, परांतूनत्याचा योग्य वापर करता आला पाहिजे . . लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही शीलाशिवाय जर शिकलेसरवलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणात समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे.
Similar questions