English, asked by sanjeevkumars309, 1 month ago

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गांेदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
रसग्रहण

Answers

Answered by rajraaz85
28

Answer:

प्रस्तुत ओळी या 'रोज मातीत' या कवितेतील आहेत. कवियत्री कल्पना दुधाळ यांनी एका शेतकरी महिलेचे जीवन वर्णन या कवितेतून केले आहे.

Explanation:

शेतकरी महिलेने आपले पूर्ण आयुष्य शेतात काम करण्यात घालवले आहे. शेतात काम करत असताना अतिशय जिव्हाळ्याने स्वतःचा जीव ओतून शेतात काम करते. शेतातील पिक जणू तिच्या शरीराचा भागच आहे असे तिला वाटते. शेतात कांदे लावत असताना तयार केलेल्या जागेत स्वतःचा जीव लावत आहे असे तिला वाटते कारण त्या शेतातील पिकावर तिचे जीवापाड प्रेम असते. काळ्याभोर जमिनीत कांदे लावून तिला हिरवगार बनवण्याचा प्रयत्न चालू असतो आणि त्यासाठी ती कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असते. कारण तिचा उद्देश एकच असतो कष्ट करणे, मेहनत करणे आणि जमिनीची मशागत करणे. अशाप्रकारे शेतकऱ्या सोबत  दिवस-रात्र मेहनत करण्यास ती स्त्री तयार असते.

Similar questions