Hindi, asked by anitamasram5, 1 month ago

सर्व घरे सारखीच का नसतात?​

Answers

Answered by sarvansingh18571
2

Answer:

sorry ma apka answer nahi de sakta because i dont understand this question

Answered by ashwinibadgujar7382
1

Answer:

इमारती व घरे : ऊन, वारा, पाऊस यांपासून व हिंस्र पशूंपासून संरक्षण व वैयक्तिक व्यवहाराकरिता आडोसा मिळेल असा आसरा मिळविण्याच्या मूलभूत प्रेरणेतून घरे व इमारतींचा उगम व विकास झालेला आहे. अगदी प्रथम माणसाने झाडाचा आश्रय घेतला, नंतर गुहा व झाडाच्या फांद्या व गवत यांचे निवार्‍यापुरेसे आसरे तयार करू लागला. त्यानंतर माणसास उभे राहून व्यवहार करता येतील अशा झोपड्या तयार झाल्या. सु. ६,००० वर्षांपूर्वी मातीच्या कच्च्या ओबडधोबड विटांची चौकोनी आकाराची घरे बांधण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विकासातून वाडे, किल्ले, निरनिराळ्या आकाराच्या व आकारमानाच्या इमारती उभारल्या जाऊ लागल्या व मनुष्याच्या इतर प्रगतीबरोबर आधुनिक बंगले, राहण्याच्या गाळ्याच्या टोलेजंग इमारती, गगनचुंबी इमारती, कारखान्याच्या व इतर खास उपयोगाच्या सार्वजनिक इमारती यांची सर्व सुखसोईयुक्त बांधणीत प्रगती झाली. ज्या त्या काळातील परिस्थितीनुरूप घराच्या बांधणीच्या पद्धतीत फरक पडत गेले. घरांच्या प्राथमिक अवस्थेत आसर्‍यास पुरेशी एक खोली असे व स्वयंपाकपाणी वगैरे बराचसा इतर व्यवहार वाडेभिंतीच्या आत उघड्यावर करीत असत, घरांना खिडक्यांऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिनीपासून उंच अंतरावर लहान झरोके ठेवीत असत. त्या काळात घरामध्ये भरपूर हवा व उजेडाची तरतूद करण्याची आवश्यकता भासत नव्हती. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वातानुकूलनाच्या, वायुवीजनाच्या, प्रकाशाच्या, दूरचित्रवाणी व इतर दळवळणाच्या, निरनिराळ्या साधनांच्या उपलब्धतेमुळे व वातावरणातील दूषित हवा व आवाज यांचा उपद्रव टाळण्याकरिता खिडक्यांविना इमारती बांधणे आता शक्य होत आहे. व्यक्ती, समाज व त्यांचा परिसर सुखदायक, सुरक्षित व उन्नतीपोषक राहील अशी घरांची व इमारतींची बांधणी असावी लागते.

इमारती व घरे यांचे (१) निवासस्थाने, (२) सार्वजनिक उपयोगाच्या इमारती व (३) कारखान्यांच्या इमारती असे स्थूलमानाने तीन प्रकार होतात. निवासस्थानांच्या बांधणीत सुखसोयी व आराम यांबरोबर अवश्य तो एकांत मिळून सामाजिक जीवनास वाव राहील, अशीही व्यवस्था करणे आवश्यक असते. सार्वजनिक उपयोगाच्या इमारतीत स्वच्छता, सुरक्षितता व वावरण्यास सुलभता यांवर जास्त भर द्यावा लागतो. कारखान्यांच्या बाबतीत सर्व पूरक इमारतींची त्यांच्या उपयोगानुसार मांडणी व सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधणी यांकडे तसेच मालाची सहजसुलभ चढउतार व हालचाल होऊ शकेल, कामास अवश्य तेवढा उजेड व वाव मिळेल, कारखान्यातील व त्याच्या परिसरातील वातावरण दूषित होणार नाही किंवा आवाजाचा उपद्रव होणार नाही अशा तरतुदींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

इमारतींची व घरांची बांधणी त्रिगुणात्मक असते. तीत (१) मजबूत व आधुनिक सुखसाधनांनी परिपूर्ण रचना, (२) उपयुक्त व कार्यक्षम मांडणी व (३) सौंदर्यपूर्ण थाटणी असावी लागते. रचनेबाबतचे सर्व काम अभियंत्याचे असते, तर उपयुक्त व कार्यक्षम मांडणीचे काम वास्तुशिल्पज्ञाचे असते. हल्ली घरे व इमारती बांधण्याचे काम वास्तुशिल्पज्ञाकडे सर्वस्वी सोपविण्याची प्रवृत्ती आहे. एक किंवा दोन खोल्यांची निवासस्थाने बांधताना वास्तुशिल्पज्ञांना फारसा वाव नसतो. अशा लहान निवासस्थानाचे प्रमाण किती मोठे आहे हे समजून येण्याकरिता भारतातील काही राज्यांतील १,००० कुटुंबांच्या पहाणीवरून आढळलेली निवासस्थानांची १९६१ मधील परिस्थिती कोष्टकरूपाने खाली दिली आहे.

Similar questions