सर्वेक्षण म्हणजे काय ? ते सांगून सर्वेक्षणाचे महत्व सांगा
Answers
Answered by
7
Answer:
सर्वेक्षण : भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात. यामध्ये निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने बिंदुबिंदूंमधील क्षितिजसमांतर अंतरे मोजणे, उंची मोजणे, त्यांमधील दिशा व कोन मोजणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. भूमापन करून जमविलेली माहिती नकाशे, जमिनीचा उंचसखलपणा दाखविणारे तक्ते वगैरेंद्वारा व्यक्त केली जाते. त्यामुळे भूमापनाबरोबरच नकाशे बनविण्याचे कामही सर्वेक्षणात अंतर्भूत असते. याव्दारे क्षेत्रफळ व घनफळ काढता येते. तसेच कोणत्या तरी सहनिर्देशक प्रणालीच्या संदर्भात स्थाननिश्चिती करता येते.
Similar questions