India Languages, asked by sharvanikulkarni, 10 months ago

सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल....

शेवटचे अक्षर *"की"* असलेले शब्द शोधायचे आहेत.

०१ दाराची बहीण --
०२ मातीची भांडी --
०३ कृष्णाची माता --
०४ नवनागातील एक नाग --
०५ एक कडधान्य --
०६ छोटे लाकूड --
०७ एक अलंकार --
०८ एक काव्यप्रकार -
०९ एक आजार --
१० एक नाते --
११ दोन बोटांनी केलेला आवाज --
१२ छोटी पोळी --
१३ रामपत्नी --
१४ छोटे तालवाद्य --
१५ नाकाचा अलंकार --
१६ केवडा--
१७ आखूड --
१८ पाहिजे तेव्हढी--
१९ चकचकीत --
२० एक रंग --
२१ शारीरिक आवेग --
२२ केरळमधील धरण--
२३ ३॥ पट --
२४ संगीत वैशिष्ट्य --
२५ दुफळी--
२६ रंग उडालेली--
२७ एका घाटाचे नांव --
२८ ढोंगी --
२९ नाचणारी--
३० पतंगाची मदतनीस --
३१ गुद्दा---
३२ स्वतःभोवती फिरणे --
३३ एक नदी --
३४ अशुभ चेहरा --
३५ मोडलेली--
३६ आवडती --
३७ लबाड --
३८ निराधार --
३९ भीती--
४० दुरावा असलेली--
४१ एक जुने नाणे--
४२ क्षणिक झोप--
४३ कापसाचे बी --
४४ बडबडी --
४५ एक ऋषी --
४६ भावंडातील दुजाभाव --
४७ एक विद्यापीठ --
४८ कीड पडलेली --
४९ एक छोटे तालवाद्य --
५० पराक्रम --
✈✈✈✈✈✈✈✈✈​

Answers

Answered by shishir303
2

प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनांनुसार, सर्व प्रश्नांची उत्तरे अशी असतील.

(प्रत्येक उत्तर शब्दाचे शेवटचे अक्षर 'की' असते)

०१ दाराची बहीण ▬▬►खिडकी

०२ मातीची भांडी▬▬► मडकी

०३ कृष्णाची माता ▬▬►देवकी

०४ नवनागातील एक नाग▬▬► वासुकी

०५ एक कडधान्य▬▬► मटकी

०६ छोटे लाकूड ▬▬►काटकी

०७ एक अलंकार▬▬► वाकी

०८ एक काव्यप्रकार▬▬► साकी

०९ एक आजार▬▬► पटकी

१० एक नाते▬▬► काकी

११ दोन बोटांनी केलेला आवाज▬▬► टिचकी चुटकी

१२ छोटी पोळी ▬▬►फुलकी

१३ रामपत्नी ▬▬►जानकी

१४ छोटे तालवाद्य▬▬► ढोलकी

१५ नाकाचा अलंकार▬▬► चमकी

१६ केवडा ▬▬►केतकी

१७ आखूड ▬▬►तोटकी

१८ पाहिजे तेव्हढी▬▬► तितकी

१९ चकचकीत▬▬► चकाकी

२० एक रंग ▬▬►खाकी

२१ शारीरिक आवेग▬▬►उचकी

२२ केरळमधील धरण▬▬►इडुक्की

२३ ३॥ पट ▬▬►अवटकी

२४ संगीत वैशिष्ट्य▬▬►गायकी

२५ दुफळी▬▬► बेकी

२६ रंग उडालेली▬▬► विटकी

२७ एका घाटाचे नांव▬▬►खंबाटकी

२८ ढोंगी▬▬► बेरकी

२९ नाचणारी▬▬► नर्तकी

३० पतंगाची मदतनीस▬▬► चक्री

३१ गुद्दा ▬▬►बुक्की

३२ स्वतःभोवती फिरणे▬▬► गिरकी

३३ एक नदी▬▬► गंडकी

३४ अशुभ चेहरा ▬▬►सुतकी

३५ मोडलेली ▬▬►मोडकी

३६ आवडती ▬▬►लाडकी

३७ लबाड ▬▬►बेरकी

३८ निराधार▬▬► पोरकी एकाकी

३९ भीती ▬▬►धडकी

४० दुरावा असलेली ▬▬►परकी

४१ एक जुने नाणे ▬▬►दिडकी

४२ क्षणिक झोप ▬▬►डुलकी

४३ कापसाचे बी ▬▬►सरकी

४४ बडबडी▬▬► बोलकी

४५ एक ऋषी▬▬► वाल्मिकी

४६ भावंडातील दुजाभाव▬▬► भाऊबंदकी

४७ एक विद्यापीठ▬▬► रुड़की

४८ कीड पडलेली▬▬► कीडकी

४९ एक छोटे तालवाद्य▬▬► टिमकी

५० पराक्रम▬▬► मर्दुमकी

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  

इतर काही मनोरंजक कोडे....►  

अशी कोणती वस्तू आहे जी समोरुन देवाने बनवली आहे अणि माघून मानसाने बनवली आहे?  

https://brainly.in/question/5207438  

═══════════════════════════════════════════  

हे कोडे छान आहे.  

या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .  

उदा.  

यंत्र - नियंत्रण  

बोध - प्रबोधन  

१ योगी  

२ वट  

३ गाव  

४ टांग  

https://brainly.in/question/16709270  

Similar questions