सर्व नागरिकांना
"रक्तदान हेच जीवनदान'
मानवता मित्रमंडळातर्फे शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दि. २३ मार्च, वेळ : सकाळी ९ ते ११ आवाहन
'तुमचे दोन थेंब रक्त
एखादयाचा प्राण वाचवू शकते.
शिबिराच्या आयोजकांना O+ रक्त गटाची मागणी करणारे पत्र लिहा.
वरील उपक्रमामध्ये
तुम्हाला तुमच्या मित्रांना सहभागी करून येण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा,
सहभागी व्हा !
Answers
Answer:
Answer:
दिनांक:२१ मार्च,२०२१
प्रिय मित्र,
सप्रेम नमस्कार.
आपण तसे नेहमी एकमेकाच्या संपर्कात असतो पण आज एक विशिष्ट कारणासाठी मी तुला पत्र लिहीत आहे. ते कारण म्हणजे आपली सर्वांची समाजाबद्दलची असणारी जाणीव आणि जबाबदारी. आपले समाजाबद्दल असणारे कर्तुत्व पूर्ण करण्यासाठी एक संधी चालून आलेली आहे. माझ्या घराजवळील मानवता मित्र मंडळाने शहीद दिनानिमित्त म्हणजे २३ मार्च ला रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तुला माहीतच आहे रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असते.
मला असे वाटते की आपल्या शाळेतील आपण जेवढे मित्र आहोत सर्वांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करू या. आपण सर्वांनी २३ मार्चला सकाळी दहा वाजता येऊन रक्तदान करू या व इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करू या.
मला माहित आहे तू आणि आपले सर्व मित्र या कार्यासाठी नक्की तयार होतील व समाजाबद्दल असणारे कर्तुत्व पूर्ण करतील.
लवकरच भेटू या.
तुझा मित्र,
आशिष