Science, asked by rameshwar63, 11 months ago

सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधा व तक्ता तयार करून वर्गात लावा

Answers

Answered by nandha2401
22

Explanation:

हे रासायनिक प्रकियेमध्ये भाग घेत नाही म्हणून त्यांना निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू असे म्हणतात. हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहेत.

अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्टय़ा अस्थिर पदार्थाभोवती अन्य कोणत्याही गोष्टींचा संपर्क टाळण्यासाठी अरगॉन वायूचे आच्छादन घालण्याची म्हणजेच निष्क्रिय वातावरण तयार करण्याची पद्धत वापरली जाते. महत्त्वाची कागदपत्रे, ऐतिहासिक वस्तूंवर वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून ती अरगॉनच्या वातावरणात ठेवतात. खरंतर पूर्वी यासाठी हेलिअमचा वापर केला जात असे, पण ज्या वस्तूमध्ये हे वातावरण तयार केले असेल त्यामधून हेलिअम हळूहळू निसटत असे आणि त्यात पुन्हा हेलिअम भरायला लागत असे. हेलिअमप्रमाणे अरगॉन मात्र पटकन निसटत नाही.

अरगॉन कमी दाबाखाली हलका लालसर आणि उच्च दाबाखाली गडद निळा प्रकाश देतो. जाहिरातीसाठी वापरण्यात येण्याऱ्या हिरव्या, निळ्या रंगछटांचा प्रकाश देणाऱ्या नळ्यांमध्ये निऑनबरोबर अरगॉन भरलेला असतो. आधुनिक फ्लुओरेसंट दिव्यात अरगॉन-क्रिप्टॉन किंवा अरगॉन-निऑन यांचे मिश्रण वापरतात. निष्किय वायूंच्या मिश्रणामुळे दिवा चटकन सुरू होण्यास व तो चालू असताना विद्युतप्रवाह वाहून नेण्यास मदत होते. नेहमीच्या वापरातील दिव्यांमधील टंगस्टन धातूची तार अतिशय पातळ असते. ती तापल्यानंतर तिचे ऑक्सिडीभवन होऊ नये, वितळू नये किंवा बाष्पीभवन होऊ नये यासाठी बल्बमध्ये अरगॉन भरतात; असे दिवे अधिक काळ टिकतात.

किरणोत्सारी कणांची संख्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘गायगर -म्यूलर’ गणकयंत्रात अरगॉनचा वापर करतात. ३९अ१ या समस्थानिकाचा अर्धआयुष्यकाल २६९ वर्षे असतो. भूजल आणि हीम गाभा यांचे कालनिर्धारण करण्यासाठी ते समस्थानिक वापरतात. तसेच स्तरीय-खडक, रूपांतरित-खडक, अग्निजन्य-खडक इत्यादींचे कालनिर्धारण करण्यासाठी अरगॉन वायूचा उपयोग करतात.

Answered by gaytrishinde19
4

Answer:yes

Explanation:yes

Similar questions