Hindi, asked by sureshpawar847, 3 months ago

सर्व प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात हे विधान पठाद्वारे पटवून द्या​

Answers

Answered by ItzMissHasini07
7

Answer:

SOLUTION

लेखिकेने जनावरांच्या इस्पितळातील भेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहेत. लेखिकेने प्रवेश केल्या केल्या तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबाकडून लाड करून घेतो. मांजरांच्या विभागात गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोळ्यांत असलेली आतुरता लेखिकेला दिसते. या आतुरतेपोटी जाळीवर नाक घासून, नखांनी जाळ्या खरवडून, मियाँव मियाँव करून, एकच कलकलाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा लेखिका त्यांचे लाड करते तेव्हा मांजरं खूश होऊन गुर्रगुर्र आवाज करून समाधान व्यक्त करतात. जेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते, तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते. पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या विभागात जाते, तेव्हादेखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने झेपावतात. एक कुत्रा तर दोन पंजे जुळवून लेखिकेला नमस्कार करतो. लेखिकेच्या पायाजवळून जाणारी आंधळी मांजरही लेखिकेने थोपटताच प्रेमाने गुर्रगुर्र करू लागते. या सर्व प्राण्यांनी लेखिकेला पाहून दिलेल्या प्रतिक्रियांमधून हे सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात याचा प्रत्यय येतो.

Answered by aasthapal78
0

Answer:

'सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात.' हे विधान पाठाधारे पटवून दया.

उत्तर : लेखिका प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या होत्या. जेव्हा त्या मांजरांच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले. लेखिकेंने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले, कुरवाळले तेव्हा मांजरांचे समाधान झाले. यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती, हे कळून येते. लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा. एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेंने प्रेमाने कुरवाळले व थोपटले, तशी ती प्रेमाने गुर्रगुर्र करू लागली. या सर्व प्रसंगांतून असा निष्कर्ष निघतो की, सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात.

.

.

.

हे उत्तर तुम्हाला मदत करेल. ☺️

Similar questions