Geography, asked by sahildalvi916, 8 hours ago

सर्वात मोठ्या अक्षवृत्तास कोणत्या नावाने ओळखले जाते?​

Answers

Answered by kalpanasalunke121
33

Answer:

follow me. I hope it helps you dear.mark me brinilest.

Explanation:

विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Answered by chamilmajumder
0

Answer:

आर्क्टिक वर्तुळ हे उत्तर ध्रुवावरील वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या उत्तरेस जवळजवळ पूर्ण वर्ष सूर्याची किरणे तिरपी पडतात. या प्रदेशात कॅनडा, ग्रीनलँड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशिया, अलास्काचा समावेश होतो .

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० किलोमीटर अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र ऋतूप्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.आपली पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नसून काहीशी लंबगोलाकार आहे. पृथ्वीचा सरासरी व्यास १२,७५० किलोमीटर असून विषुववृत्ताशी मात्र तो साधारणपणे ४३ किलोमीटरने अधिक आहे.अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर करतात. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळेविषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. फ्रेंच गयाना (French Guiana) मधील कोउरू (Kourou) येथील गयाना स्पेस सेंटर (Guiana Space Center) हे ह्याचेच एक उदाहरण आहे.

Explanation:

पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.

Similar questions