सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेचा उद्देश्य
Answers
सर्वप्रथम कुसुमाग्रज यांना प्रणाम.. माझे आवडते कवी, लेखक आहे. त्यांच्या कवितेतील समर्पकता आणि सखोलता वेगळाच ठसा उमटवून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी लिहायला सुरूवात केली… त्यांच्या कवितेतून चटके ,धगधगते
रसाळ शैली मनाला भारावून टाकते.. काव्यवाहिनी, साहित्यसुवर्ण, चांदणवेल आणि पिंपऴपान हे त्यांचे प्रमुख कविता संग्रह आहेत..
आहे आणि नाही, रूपरेषा, प्रतिसाद, प्रेम आणि मांजर, सत्तरीचे बोल आणि इतर कथा, अपाँईंटमेंट, विरामचिन्ह हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत.
सर्वात्मका शिवसुंदरा.. रसग्रहण…
ही कविता घेण्यामागचं कारण आमची शाळा. आमच्या मॅडम त्यांनी या गीताला लयबद्ध सूर लावले होते… माझ्या अजूनही लक्षात आहे ती चाल… या कवितेत कवीने प्रभूचे,, ईश्वराचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. कवी पहिल्या कडव्यात म्हणतो की, हे ईश्वरा, तू इतका सूंदर आहेस की त्याची कल्पना करतानाही अतूलनीय भाव मनी उमटतात आणि आम्ही हे मान्य केल पटलय.. स्पष्ट झालय की तूझ अस्तित्व चराचरात आहे. तू पानाफूलात गवतात, वेलींमध्ये, ताऱ्यांत, पाखरात सामावला आहेस. या सृष्टीत जिथेपण समानता आहे, धर्मांची उचनिचता नाहीय तिथे ईश्वर वसतो.
दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो की, घाम गाळणाऱ्या शेतीत तू (ईश्वर ) शेतकऱ्याचा सारथी होऊन त्याची मदत करतो. गरिबांची चाकरीत तू दयाघना होऊन उन्मळतोस. त्यांची आसवे पुसतोस.. जिथे निस्वार्थ भाव हृदयात सजतात तेथे तूझी पावले उमटतात.
अंतिम चरणात कवी म्हणतात, “देवा, तूझी साथ लाभलेली असताना अभय कोठून पायी रूततील..कोणत्याही काट्याकुट्यात, संकटात भिडस्त होण्याची तयारी आहे