'सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात . ' हे विधान पाठाधारे पटवून द्या . guys pls answer in marathi and full answer otherwise pls dont answer
Answers
Answered by
0
Answer:
'सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात.' हे विधान पाठाधारे पटवून दया.
उत्तर : लेखिका प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या होत्या. जेव्हा त्या मांजरांच्या विभागात गेल्या तेव्हा खोलीतील सर्व मांजरे कलकलाट करू लागली. त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मांजर करू लागले. लेखिकेंने जाळीतून बोट घालून त्यांना खाजवले, कुरवाळले तेव्हा मांजरांचे समाधान झाले. यातून मांजरे माणसाच्या प्रेमाची भुकेली होती, हे कळून येते. लेखिका परत फिरल्या तेव्हा मांजरे खिन्न झाली. इस्पितळात मांजरांना एकटेपणा वाटत असावा. एका जन्मापासून आंधळ्या मांजरीला लेखिकेंने प्रेमाने कुरवाळले व थोपटले, तशी ती प्रेमाने गुर्रगुर्र करू लागली. या सर्व प्रसंगांतून असा निष्कर्ष निघतो की, सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात.
.
.
.
हे उत्तर तुम्हाला मदत करेल. ☺️
Similar questions