सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज फरक
Answers
Answer:
अल्बर्ट आईन्स्टाईनने असं म्हटलंय की चक्रवाढ व्याज (Compound Interest) हे जगातलं आठवं आश्चर्य आहे. ज्यांना चक्रवाढ व्याज समजतं, ते लोक ते कमावतात आणि ज्यांना समजत नाही, ते लोक ते गमावतात (म्हणजे देतात).
आज या लेखातून आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समजून घेऊ. आधीच्या लेखात आपण चक्रवाढ व्याज काढण्याचे समीकरण पाहिले आहे . उजळणीसाठी इथे आपण ते पुन्हा पाहू.
रक्कम = ठेव* (१+(व्याज दर/१००))कालावधी
नावाप्रमाणेच, सरळ व्याज हे अगदीच सरळ आहे.
सरळ व्याज = ठेव * (व्याज दर /१००)* कालावधी
अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे सरळ व्याजाने मूळ मुद्दलावरच व्याज मिळत राहते. पण चक्रवाढ व्याजामध्ये मागील वर्षाचे व्याज मुद्दलात मिळवून आलेल्या रकमेवर व्याज मिळते. या दोघातला फरक आता आपण उदाहरणामधून समजून घेऊ.
दिलेले १,००० रुपये तुम्ही गुंतवायचा निर्णय घेतला असं आपण इथे मानू. तुम्ही १० वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहात असही आपण समजू. एक आर्थिक सल्लागार म्हणून मला तुमचा हा निर्णय अतिशय आवडलाय बरं का! गुंतवणूक करण्यासाठी २ पर्याय उपलब्ध आहेत असं समजूया.
सरळ व्याज – १०% दराने
चक्रवाढ व्याज – १०% दराने
हे गणित आता तुम्ही समजून घ्या.