sarnsh lekhan एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या
बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, “तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?"
मी एका पायावर 'हो' म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल दयावी, हा मला मोठा गौरव
वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी
राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात
एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या
उदयोगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला
मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित' शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या
बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ
आणि मग मासे मारत बैस." या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले.
परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना
मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन' बनू लागलो आहे."
Answers
Answered by
0
Answer:
क्या आप मुझे बता सकते है कि यह कौन सी भाषा मे लिखा है ?????
Similar questions