सद्यस्थितीत तुमच्या वाचन-लेखन कौशल्यांमध्ये वाढ झाली आहे की घट? याची काय कारणे असावीत असे तुम्हाला वाटते ?
Answers
Answer:
वाचन आणि लेखन एक कौशल्य असून त्यात सुधारणा करता येते अधिक माहिती खालील साईट ला भेट देऊन प्राप्त करा.
vachanmitra.com
Answer:
माझ्यामते आधी पेक्षा माझ्या लेखन आणि वाचन कौशल्यात आता घट झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान याचे कारण आहे असे मला वाटते. माझ्याप्रमाणे अनेक लोकांचे असे मत असू शकते असे मला वाटते.
पूर्वी एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे राहिल्यास पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता किंवा एखादे गणित सोडवायचे झाल्यास, कविता लिहायची असल्यास, अभ्यास करायचा असल्यास लेखना शिवाय पर्याय नव्हता; परंतु आता तसे राहिले नाही.
आता कुठलाही प्रश्न पडल्यास आपण लगेच मोबाईल किंवा संगणकावर इंटरनेट द्वारे त्याचे उत्तर शोधू शकतो. तसेच काहीतरी लिहिण्यासाठी आपल्याकडे मोबाईल किंवा संगणकावरती अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंटरनेट पुढे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधले हे आधीपेक्षा खूपच जास्त सोपे होऊन गेले. यामुळे आताचे लोक पुस्तकांवर अवलंबून न राहता इंटरनेटवर जास्त अवलंबून राहायला लागले आहेत.
या सगळ्याचा परिणाम म्हणून माझे व माझ्या सारख्या अनेकांचे पुस्तकांशी असलेले नाते दुरावले गेले. वाचन आणि लेखन कौशल्य आधी पेक्षा कमी होऊ लागले आहेत.