सविधनाच्या तरतुदी नुसार राज्यकारभार करण्याचे फायदे
Answers
Answer:
प्रश्न 1)ला पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) संविधानातील तरतुदी
उत्तर:- देशाच्या कारभारासंबंधी च्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो.
2) संविधान दिन
उत्तर:- मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात.
प्रश्न 2रा) चर्चा करा
1) संविधान समितीची स्थापना केली गेली.
उत्तर:- इसवी सन 1946 पूर्वी पर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे; तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली; म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली.
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.
उत्तर:- मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ही सर्व कामे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते.
3) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.
उत्तर:- देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते. म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात. 1)देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण. 2) रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन 3) शिक्षण, आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन 4) समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपायोजना. 5) स्वच्छतेपासून संशोधना पर्यंतचे अनेक विषय.
उत्तर:
राज्यघटना कोणत्याही देशाच्या कारभारासाठी निर्देश म्हणून काम करते. हे राष्ट्रासाठी नेत्यांच्या कल्पना, ध्येये आणि प्रेरणांना मूर्त रूप देते.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियासारख्या धार्मिक राष्ट्रांसाठी, राज्यघटना धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे, ज्यामध्ये कुराण सर्व कायद्यांचा स्रोत आहे. दुसरीकडे, वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेला भारत एकसारखा नाही. तर, भारतीय राज्यघटना हे मूर्त साधन म्हणून काम करते ज्याचा वापर भारतीय प्रजासत्ताकाच्या संस्थापकांनी नवीन भारताची संकल्पना करण्यासाठी केला होता.
स्पष्टीकरण:
संविधानानुसार देश चालवण्याचे बरेच फायदे आहेत:
राज्यघटना देशाचे कामकाज आणि शासन व्यवस्था सुव्यवस्थित करते, ते राज्याचे अधिकार तसेच नागरिकांच्या अधिकारांचे प्रमाणिकरण करते, राजकीय आणीबाणीच्या परिस्थितीतही शासन होईल याची खात्री देते, ज्यामुळे अराजकतेची भीती दूर होऊ शकते. भारतासारख्या देशांना अराजकता परवडणारी नाही. तर, संविधानाची खूप गरज आहे, तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेपासून ते तुम्ही खात असलेल्या अन्नापर्यंत आणि तुम्ही ज्या रस्त्याने तुम्ही पितात त्या पाण्यापर्यंत, सर्वकाही स्पष्ट संविधान असेल तेव्हाच सुनिश्चित केले जाते.
#SPJ