सयुजा 0 असलेले मूलद्र्वाचे कुल
Answers
Answer:
संयुजा : जेव्हा एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्यांशी संयोग पावते तेव्हा त्याच्या या शक्तीला संयुजा म्हणतात. ही शक्ती सामान्यत: अंकात मोजतात. या अंकाप्रमाणे संयुजा बंधांनीही दाखविता येते.
दुसऱ्या मूलद्रव्याशी तुलना केली असता हायड्रोजनाची संयोगशक्ती किमान आहे. म्हणून त्याची संयुजा एक धरतात. दुसऱ्या मूलद्रव्याची संयुजा त्याच्या अणूचा सामान्यत: किती हायड्रोजन अणूंबरोबर संयोग होतो, ते पाहून ठरवितात. उदा., हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल (HF), पाणी (H२O), अमोनिया (NH३), मिथेन (CH४) या संयोगांचे परीक्षण केले असता हायड्रोजनाची संयुजा एक धरली तर, फ्ल्युओरिनाची संयुजा एक, ऑक्सिजनाची दोन, नायट्रोजनाची तीन तर कार्बनाची संयुजा चार आहे असे आढळते. कोणत्याही स्थायी (स्थिर) संयोगांचे सूत्र मांडताना त्यातील मूलद्रव्यांची संयुजा समतोल ठेवावी लागते. संयुजांना दिशा असतात असे मानण्यात येते. पाण्याच्या रेणूमधील प्रत्येक OH अंतर ९.५७ नॅनोमीटर (एक अब्जांश मीटर) आणि HOH बंधाचा कोन १०४° २७‘ असतो.