India Languages, asked by asalmansari58623, 3 months ago

saykal che atmkathn ​

Answers

Answered by ProMafias
1

Answer:

hala bol bidu mark me as brainliest

Answered by iqrarhussain73
0

Explanation:

तुम्ही कधी विचार केला आहे की जर सायकल बोलू लागली तर.. म्हणून आजच्या या लेखात आपण सायकलचे आत्मकथन मराठी पाहणार आहोत तर चला सुरू करूया..

सायकलची आत्मकथा निबंध cycle chi atmakatha in marathi

मी एक सायकल बोलत आहे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी न कधी माझी स्वारी केलीच आहे. तुम्ही देखील माझा उपयोग करीतच असणार. मला जगभरात ओळखले जाते. गाव असो वा शहर प्रत्येक ठिकाणी माझा उपयोग केला जातो. आधीच्या काळात माझा उपयोग खूप केला जायचा. परंतु जेव्हापासून मोटारीचा शोध लागला तेव्हापासूनच माझा उपयोग कमी झाला. लोक जास्तकरून मोटारसायकल वापरतात. मोटरसायकल ने कमी वेळात जास्त अंतर गाठता येते. व मोटरसायकल चालवणार्याला जास्त कष्टही करावे लागत नाहीत.

पुस्तकाची आत्मकथा वाचा येथे

मला चालवण्याचे अनेक फायदे आहेत. मला चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल, सिएनजी इत्यादी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही. ज्यामुळे तुमचे पैसे तर वाचतातच याशिवाय आपल्या पर्यावरणाचेही रक्षण होते. एवढेच नव्हे तर मला चालवणाऱ्याची चांगली कसरत देखील होते. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते. माझी किंमत इतर वाहनांच्या तुलनेत कमी आहे. आजकाल डॉक्टर वजन वाढलेल्या लोकांना सायकल चालवण्याचा सल्ला देतात.

मध्यंतरी माझा उपयोग कमी झाला होता. परंतु आज लठ्ठपणा व शारीरिक समस्यांना दूर करण्यासाठी अनेक लोक माझा वापर करतात. शालेय मुले शाळेत जाण्यासाठी माझाच वापर करतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच आधीपेक्षा माझ्या मध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी मला चालवण्यासाठी खूप शक्ती लावी लागायची. माझे वजन खूप जास्त होते व मी आवाज पण करायचे. परंतु आजच्या काळात मला हलके बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माझे नवनवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले जात आहेत. गियर असलेली सायकल खूप कमी शक्तीने चालते. या शिवाय बॅटरी असलेल्या सायकली मोटार सायकल प्रमाणेच बटणावर चालतात.

Similar questions