Scenery House essay in Marathi
Answers
घराबाहेरचा देखावा
दोन वर्षांपूर्वी माझे बाबा मनाली येथे घर विकत घेण्यासंदर्भात एक जागा पाहायला गेले होते. मी हट्ट केला म्हणून ते मला सुद्धा घेऊन गेले होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा खूप सुंदर असे दृश्य डोळ्यासमोर आले.
ते घर मनोर पद्धतीत बांधण्यात आले होते. पूर्ण झाडांचा मध्ये आणि डोंगराचा मध्ये ते टुमदार घर अगदी शोभून दिसत होते. सगळीकडे हिरवळ आणि झाडांचा पानावर साठलेले बर्फ एक मंत्रमुग्ध परिसर तयार करत होता. ते घर मध्ये होते अनी त्याचा आजूबाजूला एक छोटे तळे होते. त्या तल्यावरून जाण्यासाठी एक छोटा पूल होता जो वर खाली करता येत होता. घराला बाहेरून निळा आणि सफेद रंग दिला गेला होता. ते घर आतून सुद्धा खूप मोठे आणि सुंदर होते. त्याचा आजू बाजूला एक मोठा सफरचंदाचा बगीचा होता. अनेक झाडांची कलमं तेथे लावनायत अली होती. मला ते घर फार आवडले आणि बाबांनी ते घर विकत घेण्यास होकार दिला.