Sociology, asked by dashingboy9348, 11 months ago

Science boon or curse essay in Marathi

Answers

Answered by Meeenalsharma2003
1

विज्ञान शाप की वरदान ?

आपण सर्वच म्हणतो की ' विज्ञान' हे मानवाला मिळालेले 'वरदान' आहे . विज्ञानाने मानवाचे आयुष्य बदलुन टाकले . पण अाता मानवाला उपयोगी असलेेलं विज्ञान हे शाप आहे की वरदान हा प्रश्न पडला आहे.

विज्ञान हा मानवाच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या जगात घडनाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे . विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वी काही कामे करायला दिवसोंदिवस लागायचे ते आता काही क्षणात पूर्ण होतात . विज्ञानामुळे मानवाच्या प्रचंड गती आली आहे . सर्व क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होत आहे.

पण कधी कधी विचार येतो की, नाण्याला जश्या दोन बाजू असतात ना तश्याच यालाही आहेत . विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली पण या प्रगतीच्या प्रवाहात तो इतका वाहून गेला की तो नाती , प्रेम , वात्सल्य या सर्व विसलला . या विज्ञानाच्या / तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन तो आपली संस्कृती , भाषा , बोलीभाषा विसरला . विज्ञानाचा चुकीचा उपयोग करून अणूबॉम्ब सारखे महाविनाशकारी शस्त्रास्त्रे बनवली . त्याचा उपयोग करून पृथ्वीला आपल्या मातेला विनाशाच्या वाटेवर लोटले .

विज्ञान हा मानवाला लाभलेला एक 'परिस' आहे पण त्याचा उपयोग मानवाने कसा करायचा ते त्याने ठरविले पाहीजे.

Hope it will be helpful :)

Similar questions