Hindi, asked by krantibhilare2157, 3 months ago

see the question in the photo plz don't spam​

Attachments:

Answers

Answered by Thatsomeone
4

हो प्रत्येकाच्या जीवनात काही अविस्मरणीय क्षण असतात . माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा मी माझी पहिली ऑनलाइन परीक्षा दिली तो.

माझं सातवी पर्यंत च शिक्षण ग्रामीण व दुष्काळी भागातील वडूज ता.खटाव जि. सातारा येथे झालं.मी सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होतो.तिसरी MTS परीक्षेत माझा राज्यात 3 रा क्रमांक आला आणि चौथी scholarship मध्ये राज्यात 7 वा.मला गणित या विषयाची आवड होती.माझ्या बुद्धीचतुर्यामुळे कुटुंबियांनी मला शिकायला जिल्याच्या ठिकाणी ठेवायचे ठरवले, आता प्रश्न उदभवला की ह्याला हॉस्टेल ला ठेवावं की सगळया परिवाराने स्थलांतरित व्हावं.अशातच सातारा येथील रयत शिक्षण सौंस्थेच्या सयाजीराव विद्यालयात गुरुकुल या संकल्पनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांची एका परीक्षेद्वारे निवड केली जाते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे होते. ऑनलाइन नोंदणी करून झाल्यावर परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.परीक्षेचा दिवस आला .ही माझी पहिलीवहिली ऑनलाइन परीक्षा बरका.थोडीशी भीती वाटत होती पण बाबांनी जसा पाठीवर हात ठेवला तशी माझी सर्व भीती निघून गेली.परीक्षा हॉल मध्ये पोहचलो.कॉम्पुटर वर परीक्षा हे काहीसं नवीनच होत पण तरी प्रश्न सोडवायला सुरुवात केली.2 तासाचा वेळ होता 100 गुणांची परीक्षा. मी भरभर सोडवत होतो पण कॉम्पुटर हाताळणे काहीसे अवघड व वेळ खर्चिक होत होते.त्यामुळे वेळेचं नियोजन न जमल्यामुळे माझा सगळा पेपर सोडवून नाही झाला . या परीक्षेचे गुण पेपर सुपूर्त केल्या केल्या कॉम्पुटर च्या स्क्रीन वर दिसतात. मला 100 पैकी 69 गुण मिळाले होते.पहिल्यांदाच एवढे कमी गुण मला मिळालेले. परीक्षा हॉल मधून उदास चेहरा घेऊन बाहेर आलो. समोरच आई दिसली आईला पळत जाऊन मिठी मारली . माझे पाणावलेले डोळे पाहून आई बाबांनी मला परिक्षेबाबत काही विचारलं नाही.आम्ही घरी आलो आणि मी जेवण करून झोपून गेलो. 5-6 दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला मी 69 गुणांसह 2000 विध्यार्थ्यांत 7 वा क्रमांक पटकवलल्याचे समजले.तेव्हा मला एक गोष्ट कळली की दर वेळेस आपल्याला चांगले गुण मिळतीलच असे नाही पण कमी गुणातही चांगला क्रमांक मिळू शकतो.

Similar questions