India Languages, asked by justu1112, 11 months ago

Seminar pradhusun ek samashya

Answers

Answered by Shinchanboy03
3

Answer:

प्रदूषण एक गंभीर समस्या

प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीर समस्यांचा विषय आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण ज्या गतीने वाढत चाललेला आहे की त्यामुळे सर्व जीवांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमक तरी काय?

प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी - जेव्‍हां काही विषारी पदार्थ नद्या, समुद्र, तलाव, आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात अथवा तळाशी जाऊन सडतात, कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. आणि यामुळे पाणी अशुद्ध होते आणि जलप्रदूषण होते त्यामुळे जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो. प्रदूषक पदार्थ तळाशी जाऊन, जमिनीखाली जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्‍परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण फक्‍त मानवांसाठीच नव्‍हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्‍यांसाठीही विनाशकारी आहे. प्रदूषित पाणी हे पिण्‍यासाठी, त्यात खेळण्‍यासाठी, शेती आणि उद्योगासाठी देखील अयोग्‍य आहे. ह्याच्‍यामुळे सरोवरे आणि नद्यांच्‍या सौंदर्यात्‍मक गुणवत्ता नष्ट होते.

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा - वायू प्रदूषण म्‍हणजे वातावरणात घातक दूषित पदार्थ मिश्रित होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. वायू प्रदूषणामुळे हवामानात देखील बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत.

ध्वनिप्रदूषण म्हणजे मोठा आवाज - नको असलेला, खूप जोराचा आवाज म्‍हणजेच ध्‍वनि प्रदूषण.

Similar questions