शिकारी - पक्षी - दगड कथालेखन मराठीमध्ये इयत्ता नवी
Answers
दिलेल्या शब्दांवरून कथालेखन.
शिकारी - पक्षी - दगड.
Answer:
एकदा एक शिकारी जंगलातून जात होता. जंगलातून सतत फिरत फिरत त्याने मनाशी ठरवले होते की आज नक्की मी काहीतरी शिकार घेऊन जाईल. जंगलामध्ये खूप फिरल्यानंतर तो थकला पण त्याला कोणतिही शिकार मिळाली नाही.
शेवटी जेव्हा तो थकून एका झाडाखाली बसला तेव्हा त्याचे लक्ष त्या झाडाच्या वरच्या फांदी कडे गेले. त्या फांदीवर एक छानसा पक्षी अगदी डौलाने बसला होता. या शिकाराच्या मनात आले की आपण जर या पक्ष्याची शिकार केली आणि याला बाजारात विकले तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील कारण हा अतिशय दुर्मिळ असा पक्षी होता.
शिकाऱ्याने आपल्या भात्यातील बाण काढला आणि पक्षासमोर नेम घेऊन बसला. त्याचा नेम झाडांच्या पाना मुळे व्यवस्थित लागत नव्हता. तो जागेवरून उठून थोडा बाजूला झाला व पक्षाला मारण्यासाठी परत त्याच्या बाणाचा नेम तो पक्षाकडे धरू लागला.
आपला रोखलेला बाण तो सोडेलं तेव्हा अचानक त्यांचा पाय एका दगडाला लागला व बाणाचा नेम चुकुन झाडाच्या दिशेने बाण गेला. बाण जसा झाडाच्या पानांमधून गेला त्या आवाजाने पक्षी लगेच सुरक्षितपणे तेथून उडाला. शेवटी शिकाऱ्याने प्रयत्न करून देखील तो पक्ष्याची शिकार करू शकला नाही.
गोष्टीचे तात्पर्य असे की प्रत्येक सजीवाचे जीवन-मरण हे परमेश्वराच्या हातात आहे. इतरांनी तुम्हाला कितीही मारण्याचा प्रयत्न केला पण जोपर्यंत त्या परमेश्वराची इच्छा नसेल तोपर्यंत तुम्हाला कोणीही मारू शकत नाही.