शिक्षक व विद्यार्थी नातेसंबंध ही संकल्पना स्पष्ट करा
Answers
Answer:
शिक्षक व विद्यार्थ्याचे नाते कसे असावे यावर अनेकदा बोलले जाते. जुन्या पिढीचे लोक जेव्हा या नात्याविषयी बोलतात तेव्हा त्यात सलही असते की आजकाल काही खरे राहिले नाही. पूर्वी शिक्षकाला मुले खूप घाबरायची पण आजकाल घाबरत नाहीत. आमच्या काळी शिक्षक या गल्लीतून आले तर आम्ही दुसर्या गल्लीतून जात होतो. यातून हे नाते भीतीवर आधारित असावे असेच त्यांना सुचवायचे असते. दुसरा दृष्टिकोन असा असतो की, शिक्षकाविषयी टोकाचा खूप आदर असला पाहिजे. त्यात हे नाते गुरू व भक्त या पातळीवर जाते. आपल्या पुराणातील सर्व कथा वाचून लक्षात येते की गुरूला काहीच क्रॉस क्वेश्चनिंग नाही... फक्त ओबे द ऑर्डर. तोच शिष्य महान मानला जाई की जो गुरूचे नम्रतेने चिकित्सा न करता ऐकत असे. त्यामुळे एकूणच आपल्या परंपरेत शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे दोन टोकावर हिंदोळते आहे. एका बाजूला नाते भीतीवर आधारित असावे व दुसरीकडे ते नाते टोकाच्या आदरावर आधारित असावे. अर्थात आदरातही पुन्हा सूक्ष्म भीतीच दडलेली असते. तेव्हा एकूणच आपली परंपरा शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते समान ठेवायला तयार नाही.
कृष्णमूर्तींच्या बंडखोर मांडणीत ते मुळातच गुरुपरंपरा नाकारतात. त्यांनी स्वत:च्या त्यांच्या आयुष्यात जगद्गुरूपद नाकारले होते. करोडो रुपयांची थिऑसॉफिकल सोसायटीची संपत्ती सोडून त्यांनी फकिरी पत्करली. त्यामुळे गुरू शिष्य यातील भाजणी त्यांना मान्यच नव्हती. त्यामुळे गुरू-शिष्य या प्रकारचे विषमतेचे नाते शिक्षक-विद्यार्थी संबंधात नसलेच पाहिजे हे तर ते स्पष्टपणे मांडतात.
हे नाते समान पातळीवर असले पाहिजे हे ते आग्रहाने सांगतात. ते म्हणतात की, शिक्षकाच्या मनात अहंगंड नसावा व विद्यार्थ्याच्या मनात न्यूनगंड नसावा. त्यातूनच योग्य नाते उदयाला येऊ शकेल. शिक्षकाच्या शारीर हालचाली किंवा विचार, नजर, बोलणे या कशातूनच विद्यार्थ्यात भीती संक्रमित होता कामा नये. कृष्णमूर्ती म्हणतात की, जर शिक्षकातील ही अहंगडाची भावना जर विद्यार्थ्यात उतरली तर विद्यार्थी त्याच्या भावी आयुष्यात एकतर प्रचंड उद्धट होऊ शकतो किंवा गुलाम मानसिकतेचा होऊ शकतो. शिक्षकाच्या वागणूकीचे नातेसंबंधातील चुकीच्या दृष्टीकोनाचे इतके गंभीर परिणाम होऊ शकतात.
ते पुढे म्हणतात की, शिक्षकाच्या मनातही भीती असतेच, पण ती त्याने कधीही मुलांमध्ये नात्यात संक्रमित करता कामा नये. दोन मित्र ज्याप्रमाणे एकमेकांशी बोलतात अगदी तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते असले पाहिजे. कोणतीही भावनात्मकता न आणता नम्रतेने शिक्षकाने मुलांशी बोलले पाहिजे. पण भावनात्मकता हाही ते अडसरच मानतात. त्या संभाषणात फक्त प्रामाणिकता असावी आणि नम्रता असावी.