शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद होनारा तुमच्या शब्दात लिया
Answers
Explanation:
l hope it will help you............
Answer:
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद
शिक्षक: अजय, करोनाच्या चालू असलेल्या परिस्थितीत तुमचे ज्या प्रमाणे अध्ययन चालू आहे त्याबद्दल काय सांगशील?
विद्यार्थी: सर खरच या भयानक अशा परिस्थितीत अनेक लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे झाले कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सुविधा नव्हती.
शिक्षक: विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अध्ययन झाले त्यात शिकवलेले विषय समजत होते का?
विद्यार्थी: प्रत्यक्ष वर्गात बसून एखादा विषय समजणे आणि तोच विषय इंटरनेटवरुन ऑनलाईन पद्धतीने शिकणे यात खूपच तफावत असते. बऱ्याच वेळ कम्प्युटर स्क्रीन वरून शिकवलेला पाठ समजत नाही कारण शिक्षक प्रत्यक्ष समोर नसतात. बऱ्याच वेळा इंटरनेटच्याही समस्या असतात.
शिक्षक: शिक्षकांनी शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटते?
विद्यार्थी: सर खरंच आपल्या शिक्षकांनी आम्हाला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु भरपूर वेडी इंटरनेटच्या समस्या, सतत स्क्रीन समोर बसणे आणि या ऑनलाईन शिक्षणाची सवय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच भाग समजला नाही.
शिक्षक: आता परिस्थिती सुधारल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील आणि तुम्हाला जो विषय समजला नसेल तो आम्ही परत शिकवण्याचा प्रयत्न करू.
विद्यार्थी: तसे झाले तर खूपच छान होईल. खरच सर सर्व विद्यार्थ्यांकडून मी तुमचे धन्यवाद मानतो.