शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद लेखन करा विषय "मराठी भाषेचे महत्व"
Answers
Answer:
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद लेखन पांच ते सभा ओळींत
Answer:
'मराठी भाषेचे महत्व' संवाद लेखन'
शिक्षक - मुलांनो तुम्हाला मराठी भाषा बोलायला आवडते का? विद्यार्थी - हो ती तर आपली मराठी बोलली आहे माय भाषा आहे.
शिक्षक - उत्तम! मला खूप बरे वाटले हे ऐकून आजच्या काळात मराठी भाषेचे महत्त्व खूप कमी होत चाललेले आहे यावर तुम्ही काय भाष्य करू शकता?
विद्यार्थी - सर आपल्याला मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे.
शिक्षक - अगदी बरोबर बोलताय तुम्ही मुलांनो आपली भूमी ही संतांची भूमी आहे थोर संतांनी आपल्या अभंगाद्वारे भारुड द्वारे आपल्याला खूप काही शिकवले आहे.
विद्यार्थी - सर जर मराठी हा विषय शाळेत नसता तर तर आम्हाला या थोर संतांविषयी कधीच माहिती पडले नसते कसे वाचावे कसे लिहावे हे समजले नसते.
शिक्षक - हो खरे आहे, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांनी या माय भूमी साठी खूप काही केले आहे त्याची आपणास जाण असायला पाहिजे.
विद्यार्थी - राजामुळे आपण या महाराष्ट्रभूमीत ताठ मानेने जगत आहोत ते नसते तर कदाचित आपल्याला या भूमीत गुलाम गिरीची वागणूक मिळाली असती.
शिक्षक - मुलांनो आज-काल सगळ्यांना मराठी पेक्षा इंग्रजी बोलायला जास्त आवडते त्यामुळे मराठी भाषेवरचे प्रभुत्व कमी होत चाललेले दिसते शाळेत सर्व विषय शिकवले जातात पण आपल्या भाषेवर चा पगडा आपण कधी सोडू नये हे नेहमी लक्षात ठेवा.
विद्यार्थी - आम्हीसुद्धा मराठी भाषेवर चे प्रेम असेच कायम ठेवू.