India Languages, asked by santoshmutal77, 11 months ago

शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की नसावे​

Answers

Answered by vickychoudhary9350
1

Answer:

शिक्षणाचे माध्यम मराठी असावे

Answered by ItsShree44
3

Answer:

भावना वगळा अभ्यास करावा शिक्षण म्हणजे ज्ञानप्राप्ती. आता ज्ञानप्राप्ती तेव्हाच सुलभ होईल, जेव्हा आपल्या परिचयाच्या भाषेतून ज्ञान मिळेल. शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? हा आपल्या देशात नेहमीच वादाचा प्रश्न बनतो. कारण आपल्याकडे सर्वांना आकर्षण आहे ते इंग्रजीचे ! त्यामुळे मुलांना शाळेत घालताना नेहमी प्रश्न उभा राहतो... कोणत्या शाळेत घालायचे? इंग्रजी माध्यमाच्या की मराठी माध्यमाच्या? संपूर्ण जगाचा आपण आढावा घेतला, तर असे आढळते की, कोणत्याही देशातील मुले आपापल्या मातृभाषेतूनच शिकत असतात.

सर्व शिक्षणतज्ज्ञांनी हे मान्य केले आहे की, मुलाचे शिक्षणाचे माध्यम ही त्याची मातृभाषा असावी. मातृभाषा म्हणजे त्याचे आईवडील, घरातील माणसे घरात जी भाषा बोलतात ती भाषा. कारण ती भाषा त्या बालकाच्या कानावर सतत पडत असते. कळत नकळत नवे नवे शब्द तो सतत शिकत असतो. त्याच्या स्वत:बरोबरच त्याचे त्या भाषेविषयीचे ज्ञान वाढत असते. त्यासाठी त्याला वेगळा शब्दसंचय करावा लागत नाही वा व्याकरणाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे कोणताही विषय आपल्या मातृभाषेतून शिकताना त्याचे आकलन त्याला सहज होते. त्यात भाषेचा अडसर राहत नाही. लेखनात त्याला अडचण येत नाही. आपल्या भाषेत जेव्हा विदयार्थी शिकतो तेव्हा त्याला एखादी अडचण आली तर तो आपल्या शिक्षकापुढे, मार्गदर्शकापुढे आपली अडचण सहजगत्या मांडू शकतो. पण तेच शिक्षणाचे माध्यम अन्य भाषा असेल व त्या भाषेवर त्याचे प्रभुत्व नसेल, तर आपली अडचण तो विदयार्थी मांडू शकत नाही. याउलट एखादया विषयातील प्रश्नाचे उत्तर त्याला येत असेल, पण माध्यम असलेली भाषा त्याला नीट येत नसेल तर तो उत्तर देऊ शकत नाही.

मराठी मातृभाषा असलेल्या मुलांच्या शिक्षणाचे माध्यम मराठीच असायला हवे. पण आज आपल्याला काय आढळते? मराठी माध्यम असलेल्या शाळा बंद पडत आहेत. प्रत्येक पालक - अगदी श्रीमंत आणि गरीबसुद्धा - आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे बहुसंख्य मुलांना प्रगती साधता येत नाही. त्यांना धड आपली मातृभाषाही येत नाही व इंग्रजीवरही ते प्रभुत्व मिळवू शकत नाहीत. मग इंग्रजी माध्यमात शिकण्याचा एवढा ध्यास का?

इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि आपल्या देशातही- आज स्वातंत्र्यप्राप्तीला साठ वर्षे झाली तरी - सर्व व्यवहार इंग्रजीतून चालतात. त्यामुळे आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिकली, तर त्यांना चांगली नोकरी मिळेल, अशी पालकांना खात्री वाटते. यांत पालकांची मोठी चूक आहे असे नाही. कारण अजूनही भारतात महाविदयालयीन शिक्षण व उच्च शिक्षण हे इंग्रजीतूनच चालते. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना हे महाविदयालयीन शिक्षण इंग्रजीतून घेणे अवघड जाईल, अशी सर्वांना धास्ती वाटत असते. यावर उत्तम मार्ग म्हणजे शालेय शिक्षण हे प्रत्येक विदयार्थ्याने आपल्या मातृभाषेतच घ्यावे व त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा चांगला व्यासंग करावा. म्हणजे त्याला उच्च शिक्षणात व नोकरी-व्यवसायात अडचण येणार नाही.

Similar questions