शिक्षण मानवाच्या या
शक्तींचा विकास करते -
Answers
Answer:
शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषतः आई, हे बालकाचे गुरू होत. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलत–वाढत गेल्या व आईवडिलांना चरितार्थासाठी घराबाहेर वेळ काढावा लागला. त्यामुळे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढे ‘उपजीविकेपुरते शिक्षण’ हा विचार बदलून लिहिणे, वाचणे व अंकज्ञान असे स्वरूप शिक्षणाला प्राप्त झाले. हे नवे स्वरूपही आईवडिलांना झेपेनासे झाले. त्यामुळे शिक्षण देणाऱ्या वेगळ्या यंत्रणेची जरुरी भासू लागली. त्यातूनच शाळा ही संस्था उदयास आली व शिक्षकी व्यवसायाची सुरुवात झाली. पुढे मानवाच्या विचारांची प्रगती होत गेली व जीवनातील समस्यांबाबत विचारवंत वेगवेगळे सिद्धांत मांडू लागले. मानवाचे सर्वसामान्य स्वरूप व त्याची प्रगती, यांविषयीचे विचारही मांडण्यात येऊ लागले. शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्ये आणि अभिवृद्धी यांचे संपादन असल्याने तत्त्ववेत्त्यांनी शिक्षणविषयक सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात शिक्षण ही एक कला मानली जाई. तथापि शास्त्राच्या प्रगतीचा शिक्षणविषयक विचारांवर प्रभाव पडून शिक्षण हे कलेबरोबर शास्त्रही आहे, असे मानण्यात येऊ लागले.