India Languages, asked by VaishnaviTaware, 8 months ago

२) शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली | भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली॥
​Explain

Answers

Answered by seemahadawale
44

Explanation:

भाकरी

शेकडो वेळा चंद्र आला

तारे फुलले रात्र धुंद झाली।।

भाकरीचा चंद्र शोधण्यातच

जिंदगी बरबाद झाली।।

नारायण सुर्वे यांची ही कविता लहानपणी मनात घर करून गेली होती!

माझ्या बाबतीत तसे घडले नसले तरी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भाकरी वेगवेगळ्या रूपात बघायला मिळाली.

लहानपणी एकत्र कुटुंब, पै पाहुणा यांची घरी रेलचेल होती. आई कित्येक वेळा सकाळी स्वयंपाक करून न जेवता शाळेत शिकवायला जायची आणि घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळची कामे,सर्वांना जेवायला वाढून स्वतः जेवायला बसली की नेमक्या पोळ्या संपलेल्या असायच्या. मग ती पट्कन एखादी भाकरी टाकायची! मी सावलीसारखी तिच्या मागे मागे असायची.माझे जेवण झाले असले तरी स्वतः जेवण्यापूर्वी मला एक घास द्यायची ती! तेव्हा त्या भाकरीत मला तिचे प्रेम, दिवसभराचे कष्ट, सोशिकपणा, दिसायचा!

कधी कधी सर्वांनाच भाकरी पिठले वांग्याच्या भाजीचा बेत असायचा!तेव्हा मी भाकरीचा मऊ भाग खायची आणि माझा धाकटा भाऊ कुरकुरीत पापुद्रा डोसा म्हणून खायचा! तेव्हा ती भाकरी हॉटेलमधल्या डोशासारखी वाटायची!

कॉलेजमध्ये असताना अधून मधून सिंहगड ट्रिप व्हायची! तिथल्या मोकळ्या हवेत पिठले ,भाकरी ,कांदा भजी, दही असे खाणे म्हणजे आपण काय ऐश करतोय असे वाटायचे. पण विरोधाभास असा की जी भाकरी ऐश करण्यासाठी खायला आम्ही घरच्या पोळ्या सोडून यायचो तीच भाकरी कोणाच्यातरी घरचा "भाकरीचा प्रश्न" सोडवत होती.ती भाकरी सणावाराला त्यांच्या घरी पोळीची ऐश घडवणार होती.

पुढे नोकरीला लागले तिथे ऑफिस मध्ये एक १७-१८ वर्षाचा मुलगा काम करायचा! रोज ऑफिस झाडणे चहापाणी करणे हे त्याचे काम.आम्ही सगळे रोज एकत्र डबा खायचो.त्याच्या डब्यात रोज तीन भाकऱ्या आणि एखादी चमचमीत उसळ किंवा रसभाजी असायची.आणि झाकणावर मीठ असायचे. मी त्याला म्हणायची मस्त वास येतो तुझ्या डब्यातल्या उसळीचा! पण रोज

एवढे वरून मीठ खात जाऊ नकोस.त्याच्या घरी आई नव्हती. ३ भाऊ आणि वडील.हा धाकटा! वडील सकाळी भाजी करून जायचे.भाजीत मीठ कमी जास्त असेल नसेल ते बघायला त्यांना वेळ नसायचा! मग सगळेजण डब्यात थोडे मीठ आणायचे.कधी कमी झाले तर लावून खायला!म्हणजे वडिलांना सांगायला नको काय कमी जास्त झालेय.आणि रोज एकेका भावाची पाळी असायची भाकरी करण्याची. एक दिवस त्याने सकाळी सकाळी माझ्यासमोर डबा धरला.डब्यात ४ भाकऱ्या आणि वाटाण्याची उसळ.मला म्हणाला,"ताई आज माझी पाळी होती भाकरी करण्याची.आज मी तुमच्यासाठी करून आणलीय भाकरी.माझा बा वाटण्याची उसळ लै झ्याक बनवतो! खाऊन घ्या गरम गरम!" त्याला नाही म्हणले असते तर तो त्याचा अनादर झाला असता.मग मी मस्त भरपेट उसळ भाकरी खाल्ली. त्यादिवशी भाकरीत मला निखळ निर्व्याज माया दिसली!

पुढे लग्न होऊन सिंगापूरला आले. तेव्हा इकडे ज्वारीचे पीठ वगैरे प्रकार मिळायचे नाहीत त्यामुळे भारतातून येताना आईची माया त्या भाकरीच्या पिठाच्या रूपाने बरोबर यायची.मग "वीकएंडला स्पेशल ट्रीट" म्हणून पिठले भाकरीचा बेत असायचा! माझ्या सासूबाई एकदम पातळ भाकऱ्या करायच्या.त्यांच्यासारख्या मला काही केल्या जमायच्या नाहीत.कधी भाकरी मोडायची तर कधी चिकटून बसायची.कधी फुगायची नाही तर कधी तव्याला चिकटायची! पण मी चिकाटी सोडली नाही.चुकत माकत करत राहिले.त्या भाकरीत मला माझ्यातली शिकाऊ विद्यार्थिनी दिसायची!

कधी सुट्टीला भारतात गेले की आतेभावाच्या शेतात ट्रीप होते. तिथे आमच्यासाठी स्पेशल म्हणून पुरणपोळी आणि काळी रसई केली जाते आणि गेल्यावर मी त्यांना माझ्यासाठी भाकरी करा असे सांगते तेव्हा त्या मावशी माझ्याकडे ज्या नजरेने बघतात तेव्हा मला नेहमी अशी शंका येते की मनात त्या खूप हसत असणार मला, की ही पुरणपोळी सोडून भाकरी काय मागते..पण त्यांना काय माहीत की ती भाकरी माझ्यासाठी पुरणपोळीपेक्षा गोड असते.

अधूनमधून आम्ही आमच्या गुरुंच्या मठात जातो.तिथे कागदासारख्या पातळ भाकऱ्या आणि त्यावर मठातल्या गायींचे लोणी असते.तिथल्या स्वच्छ पवित्र वातावरणात प्रसादाचे जेवण पंगतीत बसून जेवताना त्या भाकरीत मला मनाची शांती आणि आत्मसमाधान दिसते.

आता बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर टम्म फुगणारी ज्वारीची/ तांदुळाची भाकरी जमायला लागली आहे. हल्ली पोळीपेक्षा भाकरी बरी चा प्रचार सुरू आहे. त्यामुळे भाकरी ही वीकएंड स्पेशालिटी न राहता डेली स्टेपल व्हायला लागली आहे. कधीकधी घरी पोळ्या असल्या तरी भाकरी खायची इच्छा होते.मग मीपण एखादी भाकरी टाकते. मुले जेवली असली तरी माझ्यातला एक घास मुलांना देते..अश्या वेळी हमखास आईची आठवण येते. माझ्या भाकरीला तिच्या कष्टाची सर नाही पण मला त्यात माझ्यातली आई दिसते!

Mark me as branalist☺️

Answered by pratik00046
25

answer is in the picture

who needs please chech out

Attachments:
Similar questions