India Languages, asked by RENUKA5567, 10 months ago

शिकलेल्या हुशार लोकांसाठी या कोड्यात संकेत(क्लू) म्हणून दोन इंग्रजी शब्द दिले आहेत त्यावरून प्रसिद्ध *मराठी* म्हणी वा वाक्प्रचार ओळखा.पहिलं कोडं सोडवलं आहे.....
१. Kick , water :- लाथ मारीन तिथे पाणी काढीन.
२. Snake , hole :-
३. Pet animal , tail :-
४. Pipe , through air :-
५. Stomach , God :-
६. Taste , jaggery :-
७. Sheep's life , bad taste :-
८. Dance , court-yard :- ९. Cat , witness :-
१०. Blind , eyes :- ११. New thing , 9 :-
१२. Own , teeth :- १३. Fist , amount :-
१४. 2 fighting , benefit :-
१५. Seed , grow :-
१६. Mine , clay :-
१७. Shallow , noise:-
१८. Roar , rain fall ? :-
१९. Salt , loyalty :-
२०. Uncle , moustache :-
२१. Seen God , salute :-
२२. Neighbour , critic :-
२३. Rabbit , hunter :-
२४. Mountain , beautiful :-
२५. Drowning , stick:-
२६. Money , work :-

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

या कोड्यात संकेत(क्लू) म्हणून दोन इंग्रजी शब्द दिले आहेत त्यावरून प्रसिद्ध *मराठी* म्हणी वा वाक्प्रचार ओळखा.पहिलं कोडं सोडवलं आहे.....

१. Kick , water :- लाथ मारीन तिथे पाणी काढीन.

२. Snake , hole :-आयत्या बिळात नागोबा

३. Pet animal , tail :-कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच

४. Pipe , through air :-नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे

५. Stomach , God :- आधी पोटोबा मग विठोबा

६. Taste , jaggery :-गाढवाला गुळाची चव काय

७. Sheep's life , bad taste :- मेंढी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड

८. Dance , court-yard :- नाचता येईना अंगण वाकडे

९. Cat , witness :-उंदराला मांजराची साक्ष

१०. Blind , eyes :- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

११. New thing , 9 :-नव्याचे नऊ दिवस

१२. Own , teeth :- आपलेच दात आपलेच ओठ

१३. Fist , amount :- झाकली मूठ सवा लाखाची

१४. 2 fighting , benefit :-दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

१५. Seed , grow :-पेराल तसे उगवेल

१६. Mine , clay :-घरोघरी मातीच्या चुली

१७. Shallow , noise:-उथळ पाण्याला खळखळाट फार

१८. Roar , rain fall ? :-गरजेल तो पडेल काय

१९. Salt , loyalty :- खाल्या मिठाला जागले पाहिजे

२०. Uncle , moustache :-आत्याबाईला मिशा असत्या तर.... तिला काका म्हंटले असते.

२१. Seen God , salute :- देखत्या देवाला नमस्कार

२२. Neighbour , critic :- निंदकाचे घर असावे शेजारी

२३. Rabbit , hunter :-

२४. Mountain , beautiful :- दुरून डोंगर साजरे

२५. Drowning , stick:-बुडत्याला काठीचा आधार

२६. Money , work :-दाम करी काम

It may helps you...

Mark as brainlist...

Take Care...

# Indians Fights Against Corona....

Answered by Anonymous
1

Answer:

प्रसिद्ध *मराठी* म्हणी वा वाक्प्रचार ओळखा.पहिलं कोडं सोडवलं आहे

Explanation:

१.लाथ मारीन तिथे पाणी काढीन.

२. आयत्या बिळात नागोबा  

३. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच  

४. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे  

५. आधी पोटोबा मग विठोबा  

६. गाढवाला गुळाची चव काय  

७. शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड  

८. नाचता येईना अंगण वाकडं  

९. उंदराला मांजर साक्ष  

१०. आंधळा मागतो एक देव देतो दोन डोळे  

११. नव्याची नवलाई  

१२. आपलेच दात आपलेच ओठ  

१३. झाकली मूठ सव्वा लाखाची  

१५. पेराल तसे उगवते  

१६. खाण  तशी माती  

१७. उथळ पाण्याला खळखळाट फार  

१९. खाल्ल्या मिठाला जागणे  

२०. आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते.  

२१. देखल्या देवा दंडवत  

२२. निंदकाचे घर असावे शेजारी

२४. दुरून डोंगर साजरे  

२५. बुडत्याला काडीचा आधार  

२६. दाम करी काम

Similar questions