शेख महंमद यांची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.मराठी फ्रॉम स्टोरी सलाम नमस्ते
Answers
Answer:
श्री संत शेख महंमद महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मूळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर हे आहे. शेख महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. मालोजीराजे भोसल्यांनी यांना गुरू मानले होते. तसेच समर्थ रामदासांनी यांच्यावर आरती रचली आहे. योगसंग्राम पवनविजय व निष्कलंकप्रबोध या त्यांच्या प्रमुख रचना आहेत.
शेख महंमद यांच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ते संत तुकारामांचे समकालीन होते. भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सद्भावनेचे प्रतिक म्हणून संतकवी शेख महंमद यांच्या कार्याकडे पाहता येते. जगभरातून अभ्यासक, पर्यटक शेख महंमद यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी दरवर्षी येत असतात. साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी शेख महंमद यांच्या समाधी परिसरात सात दिवसांचा 'अखंड हरिनाम सप्ताह' ग्रामस्थांतर्फे आयोजित केला जातो. ज्यामध्ये सर्व जाती-धर्म आणि पंथाचे लोक सामील होतात. सप्ताहानंतर दोन दिवसांची यात्रा भरवली जाते. यात्रे दरम्यान भरवला जाणारा जंगी कुस्त्यांचा आखाडा 'हगामा' हा ही पंचक्रोशीत उत्सुकतेचा शिरोबिंदू असतो.
ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||
काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा ||
फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे ||
नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन ||
शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||
Explanation: