शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलिंडर सोबत नेला जातो."का
Answers
Answered by
0
Answer:
शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सीजन सिलेंडर सोबत नेला जातो.
Explanation:
कारण समुद्रसपाटीपासून जस-जसे वरती जावे तस-तसे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी कमी होत जाते. समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या भागांमध्ये झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण ही कमी होते. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे असे बदल घडायला सुरुवात होते. असा कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून गिर्यारोहक वर जात असतांना आपल्या सोबत ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात व जेव्हा ही त्यांना कुठलाही त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा ते या सिलेंडरचा वापर करतात. म्हणूनच गिर्यारोहक नेहमी पर्वत चढत असताना किंवा शिखर सर करत असताना ऑक्सीजन सिलेंडर सोबत घेऊन जातात.
Similar questions