शिलालेख विषयी माहिती मराठी
Answers
Answer:
शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते.[१] राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.[२] शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.
- भाषा :-
प्राकृत, पाली, संस्कृत, वा अन्य आर्य- भारतीय भाषांमध्ये लिहिलेली शिलालेख आढळून येतात.
- स्वरूप:-
सर्वात जास्त शिलालेख हे ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेण्यात सापडतात. या लेखांमधील मजकूर अनेकदा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडलेले मौर्य अशोकाचे शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिलालेख होत.
Answer:
शिलालेख म्हणजे दगडावर कोरली जाणारी माहिती उल्लेख भौतिक साधने आहेत