शालेय ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापकांना शालेय ग्रंथालयासाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत मिळावी यासाठी विनंती करणारे पत्र लिहा.
Answers
दिनांक: ३ एप्रिल २०२१
प्रति,
माननीय श्री. यदुनाथ चाफेकर व्यवस्थापक- मातृसेवा पुस्तकालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, ता.जि. लातूर ४०००१
विषय: अधिक सवलत देण्याविषयी.
महोदय,
मी स्नेहल ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल, लातूर या शाळेची शालेय ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. दिनांक २ एप्रिल | रोजी आमच्या शाळेने आपल्या पुस्तकालयातून सुमारे ३०० वेगवेगळया पुस्तकांचा संच खरेदी केला आहे. ही सर्व पुस्तके सर्व विद्यार्थ्यांकरताशाळेच्या ग्रंथालयातर्फे उपलब्ध करून दिली | जाणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या २०% सवलतीशिवाय अधिकची सवलत दिल्यास उरलेल्या रकमेतून शालेय ग्रंथालयासाठी आणखी काही पुस्तके घेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे, या खरेदीवर आपण सवलत द्यावी अशी | मी आपणांस नम्र विनंती करते.
कृपया, सवलती संदर्भात विचार करून लवकरात लवकर उत्तर कळवावे ही विनंती.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
स्नेहल शालेय ग्रंथालय प्रतिनिधी, ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल
घनश्यामनगर,