India Languages, asked by kanchanvnagre143, 1 day ago

शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा . ​

Answers

Answered by Sauron
68

उत्तर :

औपचारिक पत्र लेखन :

दिनांक : 29 जानेवारी, 2022

प्रति,

मा.व्यवस्थापक,

सरस्वती प्रकाशन,

पुस्तक विक्री विभाग,

दादर पश्चिम

मुंबई - 414001.

विषय : शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.

मा.व्यवस्थापक महोदय,

मी ऋत्विज खुराणा, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहितो की,आमच्या शाळेमधील ग्रंथालयांमध्ये काही शालेय पुस्तकांची गरज भासत आहे. ती पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती पुस्तके आमच्या ग्रंथालयासाठी हवी आहेत.विद्यार्थ्यांसाठी काही शालेय पुस्तकं व काही मनोरंजनासाठी आवश्यक आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे:

1) मराठी युवकभारती

2) हिंदी युवकभारती

3) इतिहास (11 वी )

4) भूगोल (11 वी)

5) अर्थशास्त्र (12 वी)

त्यासोबतच काही ऐतिहासिक व प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी हवी आहेत

1) राऊ

2) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे

3) अग्निपंख - डॉ. ए. पी . जे अब्दुल कलाम

4) मुसाफिर - अच्युत गोडबोले

वरील सर्व पुस्तक विशेष सवलती मध्ये उपलब्ध करून द्यावी ही विनंती. या पत्रासोबत ठेव रकमेचा चेक पाठविण्यात येत आहे. तसेच उर्वरित रोख रक्कम पुस्तके मिळाल्यानंतर देण्यात येईल.

आभार सहित,

आपला विश्वासू,

ऋत्विज खुराणा.

(विद्यार्थी प्रतिनिधी)

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल,

पुणे - 411007.

Answered by roopa2000
12

      शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा . ​

दिनांकः१९ जानेवारी,२०२२

प्रति,

माननीय व्यवस्थापक

आदर्श पुस्तकालय

दादर पश्चिम-४०००९५

[email protected]

विषयः शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत.

माननीय महोदय,

आपणास कळवण्यात खूप आनंद होत आहे की आमच्या सरस्वती विद्यालयात  विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येत आहे. पुस्तक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रातील विविधांगी पुस्तकांचे संग्रह या ग्रंथालयात करण्याचे नियोजित आहे.

आमच्या शाळेतील ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या इतिहास, भूगोल, विज्ञान, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा सर्व विषयातील प्रत्येकी १०० पुस्तकांची आमची मागणी आहे. पुस्तकांची यादी या पत्रासोबत आम्ही जोडत आहोत. जसाही पुस्तकांचा पुरवठा होईल तसे तुमचे पैसे पाठवण्यात येतील.

यादीतील सर्व पुस्तके कृपया वेळेतच पोहोचले पाहिजे याची खात्री करावी.

आपला विश्वासू,

अ.ब.क.,

ग्रंथपाल,

सरस्वती विद्यालय, ठाणे .

know more about it

https://brainly.in/question/49832729

https://brainly.in/question/25651379

Similar questions